Join us

कुणीतरी येणार येणार गं...! 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाच्या डोहाळ जेवणाचा थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 5:38 PM

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

स्टार प्रवाह(Star Pravah) वरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे अरुंधती आपलं नवं आयुष्य सुरु करु पाहतेय तर दुसरीकडे अनघाच्या आयुष्यातही नवा पाहुणा येणार आहे. अनघा लवकरच आई होणार असून देशमुख कुटुंबाने थाटामाटात अनघाचं डोहाळ जेवण करायचं ठरवलं आहे. 

देशमुख कुटुंबात प्रत्येक सण-समारंभ अगदी उत्साहात साजरा केला जातो. अनघाच्या डोहाळ जेवणाला सुद्धा संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करणार आहे. एकीकडे आनंदाचं वातावरण असलं तरी या खास प्रसंगी अभिषेकचं एक खास गुपित संपूर्ण कुटुंबासमोर उघड होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिषेकचा बदलेलला स्वभाव अरुंधती आणि अनघासोबतच घरातील प्रत्येकालाच खटकतोय. अनघाच्या डोहाळ जेवणाला अभिषेकचं खरं रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळाले की, अरुंधती आणि आशुतोष एका कॅफेत जातात. तिथे अरुंधती आशुतोषकडे प्रेमाची कबुली देत असताना तितक्यात तिथे तिला अभिषेक दुसऱ्या मुलीसोबत दिसतो. तो तिथे तिचा हात पकडून येतो आणि हातावर किस करतो. हे पाहून अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो. आता ही गोष्ट अनघाला कळल्यावर अनघा निर्णय घेईल आणि यात तिला देशमुख कुटुंब तिला कशी साथ देणार हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
टॅग्स :आई कुठे काय करते मालिका