Join us

​मुसकान मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या सोनाक्षी सावेने या मराठी नाटकांमध्ये केले आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 6:52 AM

अनेक कलाकार आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही रंगमंचावरून करतात. रंगमंचावर काम करताना खूप काही शिकायला मिळते असे त्यांचे म्हणणे असते. ...

अनेक कलाकार आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही रंगमंचावरून करतात. रंगमंचावर काम करताना खूप काही शिकायला मिळते असे त्यांचे म्हणणे असते. स्टार भारत या वाहिनीवर सुरू झालेल्या मुस्कान या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षी सावेने देखील तिच्या करियरची सुरुवात ही रंगमंचावरूनच केली आहे.सात वर्षीय सोनाक्षी सावे या बालकलाकाराची कथा अतिशय प्रेरणादायी आहे. तिने मराठी नाटकांमधून काम करायला सुरुवात केली. नाटकांमध्ये काम करताना तिला खूप काही शिकायला मिळाले. मराठी नाटकांमुळेच तिला स्टार भारतवरील आगामी शो मुसकानमध्ये प्रमुख भूमिका साकारायला मिळत आहे.सोनाक्षीने ‘शाळा’, ‘घर घर’ आणि ‘मुंबई दर्शन’ अशा नावाजलेल्या मराठी नाटकांमधून अभिनय केला आहे. तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा.वामन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी केंद्रे यांच्यासोबत काम केले आणि बालरंगपीठसोबत सुट्टीतील कार्यशाळेतही भाग घेतला. नाटकांमधील तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. आता ती छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे. ती पहिल्यांदाच एका मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी मुसकान या मालिकेत काम करण्यास खूपच उत्सुक आहे. याविषयी ती सांगते, “मला अभिनय करायला आवडतो. मला प्रियांका चोप्राप्रमाणे मोठी अभिनेत्री बनायचे आहे. मला भविष्यात मोठी उंची गाठायची आहे. मराठी रंगमंचाचा मी खूप आदर करते, तिथूनच मी माझ्या करिअरला सुरुवात केली आहे.”काही विशिष्ट कारणास्तव आपली आई आरती हिच्यापासून दूर बोर्डिंग स्कूलमध्ये जाव्या लागणाऱ्या मुस्कान या सात वर्षांच्या मुलीची कथा ‘मुस्कान’ या आगामी मालिकेत सादर करण्यात आली आहे. या मालिकेत आरतीच्या भूमिकेत प्रेक्षकांना अरिना डे या अभिनेत्रीला पाहायला मिळणार आहे. या आगामी मालिकेच्या काही प्रसंगांचे चित्रीकरण दार्जिलिंग आणि कोलकाता येथील स्थळांवर प्रत्यक्ष जाऊन करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर शाहरूख खानच्या ‘मैं हूँ ना!’ या चित्रपटात दार्जिलिंगमधील ज्या सेंट पॉल स्कूल या बोर्डिंग स्कूलमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते, त्याच बोर्डिंग स्कूलमध्ये या मालिकेचेही चित्रीकरण करण्यात आले आहे.Also Read : दार्जिलिंगमधील 2 अंश थंडीत सोनाक्षी सावे गारठली!