मंदिराच्या रूपात सोनल वेंगुर्लेकर साकारणार अष्टपैलू व्यक्तिरेखा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 06:15 AM2018-01-24T06:15:23+5:302018-01-24T11:45:23+5:30

विभिन्न प्रकारचे स्तर असलेल्या व्यक्तिरेखा अनेकदा मालिकांमध्ये मसाला घालण्यासाठी आणल्या जातात. साम दाम दंड भेदची प्रमुख अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर ...

Sonal Vengurlekar will be the all-round personality figure in the form of a temple | मंदिराच्या रूपात सोनल वेंगुर्लेकर साकारणार अष्टपैलू व्यक्तिरेखा

मंदिराच्या रूपात सोनल वेंगुर्लेकर साकारणार अष्टपैलू व्यक्तिरेखा

googlenewsNext
भिन्न प्रकारचे स्तर असलेल्या व्यक्तिरेखा अनेकदा मालिकांमध्ये मसाला घालण्यासाठी आणल्या जातात. साम दाम दंड भेदची प्रमुख अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर मंदिराची भूमिका साकारत असून अजूनपर्यंत तरी तिची व्यक्तिरेखा सकारात्मक आहे. पण लवकरच तिच्या व्यक्तिरेखेला अधिक स्तर येतील.

आता तिची सकारात्मक व्यक्तिरेखा हळूहळू बदलू लागेल. सोनल मंदिराच्या व्यक्तिरेखेमध्ये पूर्णपणे शिरली असून आता शोमधील नाट्‌य निश्चितपणे वाढेल. तिची व्यक्तिरेखा विजय आणि बुलबुल यांच्यात गैरसमजूती घडवण्यासाठी कटकारस्थाने करेल.

आपला अनुभव सांगताना सोनल म्हणाली, “कलाकाराला कुठलीही व्यक्तिरेखा करायला यायला हवी. भूमिका छोटी असो किंवा मोठी, चांगली किंवा वाईट, ती खरी वाटायला हवी. ह्या शो च्या कथानकानुसार माझ्या कामाबद्दल मी आनंदी आहे आणि प्रेक्षकांसमोर चांगले परफॉर्म करत राहिन.”

‘साम दाम दंड भेद’ मालिकेत विजय नामधारीची भूमिका साकारणारा भानू उदय हा असाच एक कलाकार असून त्याने या भूमिकेसाठी अनेकदा आपले वजन प्रचंड प्रमाणात वाढविले आणि ते पुन्हा नेहमीच्या पातळीवर आणले.सूत्रानुसार, मालिकेच्या दिग्दर्शकांनी सुरुवातीला भानूला आपले वजन वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार भानूने आपल्या आहारात बदल करून आपले वजन वाढविले. वजन वाढण्यात काही अडचण आली नाही, परंतु अगदी अल्प काळात इतक्या प्रमाणात वजन वाढविण्याचा त्रास झाला. अशा त-हेने वजन वाढविणे हे आरोग्यास हानिकारक असते. परंतु भानूला ही भूमिका मनापासून आवडल्याने त्याने हा त्रास सहन केला.परंतु त्यानंतर पटकथेत काही बदल करण्यात आले आणि भानूला 25 वर्षांच्या तरुणाची भूमिका साकारण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्याला हे वाढलेले वजन कमी करणे भाग होते. पण भानूने नियमित व्यायाम आणि आहारावरील कठोर निर्बंधांद्वारे आपले वाढलेले वजन घटवून आपली अंगयष्टी एखाद्या 25 वर्षीय तरुणाइतकी सडपातळ केली.

Web Title: Sonal Vengurlekar will be the all-round personality figure in the form of a temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.