Join us

ही मराठमोळी अभिनेत्री पतीसोबत करतेय मनालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 19:30 IST

इन्स्टाग्रामवर तिने अलीकडेच तिचे व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरेने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीने इन्स्टाग्रामवर नुकताच तिच्या व्हॅकेशनचे फोटो शेअर केला आहेत ती सध्या कुटुंबासोबत मानलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. पती आणि मुलीसोबतचे एन्जॉय करतानाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे.बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली.

मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.  सोनाली खरेची मुलगी सनाया अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. ती ब्लड रिलेशन या लघुपटात झळकणार आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सई देवधरने केले आहे. तर निर्मिती पर्पल मॉर्निंग मुव्हिजने केली आहे.

टॅग्स :सोनाली खरे