"तू फक्त हिंदी इंग्रजीमध्येच बोलणार का" ? जरा मराठीतही बोल, सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:45 AM2021-12-18T11:45:47+5:302021-12-18T11:46:17+5:30
नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma Show) रवी किशन( Ravi Kishan), सचिन खेडेकर(Sachin Khedekar) आणि सोनाली कुलकर्णी(Sonali KUlkarni) यांनी हजेरी लावली. यावेळी नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी अंदाजात कॉमेडीयन कपिल शर्माने त्यांचे स्टेजवर स्वागत केले.
छोट्या पडद्यावरील कपिल शर्मा शो हा घराघरात प्रसिद्ध आहे. आपल्या सिनेमाचे म्हणा किंवा अन्य काही प्रोजेक्टचे प्रमोशन करण्यासाठी सेलिब्रेटी मंडळी कपिल शर्मा शोमध्ये आवर्जुन हजेरी लावत असतात. सेलिब्रेटीसुद्धा या शोमध्ये हजेरी लावण्यासाठी खूप उत्सुक असतात. नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये रवी किशन, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली. यावेळी नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी अंदाजात कॉमेडीयन कपिल शर्माने त्यांचे स्टेजवर स्वागत केले. यावेळी कपिल शर्मानेही या तिघांबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यावेळी अचानक सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माची मराठीत बोलत नसल्यावरुन त्याची फिरकी घेतली. मुंबईत राहतोस आणि मराठीत बोलत नाहीस असे म्हटल्यावर कपिल शर्मानेही त्याच्या खास अंदाजात सोनालीलाही उत्तर देताना दिसला.
सोनाली आणि कपिल शर्मा या दोघांचा मराठी भाेषवरुन झालेले संवादाने उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते. सध्या या शोचा हा प्रोमो समोर आला आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. विनोदी ढंगातला व्हिडीओ असला तरी चाहते मात्र यावर संमिश्र प्रतिक्रीया देतान दिसत आहे. अनेकांनी सोनाली कुलकर्णीचे कौतुकही केले आहे. सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.
वयाच्या चाळीशीतही सोनाली कुलकर्णी फारच ग्लॅमरस दिसते. सोनालीला सायकलिंगची आवड आहे. ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.दररोज सकाळी साडेचार वाजता उठून ती दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि 20-25 किमी सायकलिंग करते. रविवारी सुट्टी असली तरी ती सोनाली आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.