Sonali Phogat Death Case: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला नसून त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवानने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा गोवा पोलिसांनी केला आहे.सोनाली फोगाट हत्येप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी पीए सुधीर सांगवान याला अटक केली होती. सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला नसून त्यांना जाणूनबुजून ड्रग्ज देण्यात आले होते, अशी कबुली दोन्ही संशयित आरोपींनी दिली असल्याची माहिती गोवा IGP पोलिसांनी दिली आहे. सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हरडोस झाला होता. ANI नं याबाबत वृत्त दिलं आहे.
सोनाली फोगाट मृत्यूच्या आदल्या रात्री ज्या क्लबमध्ये पार्टी करत होत्या तिथलं सीसीटीव्ह फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून गोवा पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगाट यांच्याबरोबर दोन्ही संशयित आरोपीपीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर पार्टी करताना दिसत आहे. दोघे सोनाली यांना जबरदस्ती काही तरी पाजण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिवस आहे. दोघांनी सोनाली यांच्या ड्रिंक्समध्ये ड्रग्ज मिसळून त्यांना जबरदस्ती पाजलं. सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हर डोस झाल्याचं गोवा पोलिसांनी म्हटलं आहे.
सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने तिच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती. सोनालीचा मृत्यू हा किरकोळ नसून, ते कटकारस्थान आहे, अशी तक्रार दाखल केली होती. सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी मिळून माज्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सोनाली वषार्नुवर्षं सुरू असलेला बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि स्लो पॉयझनिंगची बळी ठरली आहे, असं तक्रारीमध्ये म्हटलं होतं.