'तारक मेहता मधील का उलटा चष्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) हा गेली १६ वर्ष भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय शोपैकी एक आहे. 2008 पासून सुरू असलेला हा शो आजही प्रेक्षकांना आवडतो. शोमधील अनेक पात्रांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 'तारक मेहता मधील का उलटा चष्मा' मधील असंच एक पात्र चांगलंच लोकप्रिय झालं ते म्हणजे सोनू. सोनूची भूमिका पहिल्यांदा साकारली ती अभिनेत्री झील मेहता.(Jheel Mehta)
बालकलाकार म्हणून झीलने आत्माराम भि़डेची लेक सोनूची भूमिका साकारली. सोनूच्या भूमिकेतून झीलला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण मालिका टॉपवर असताना झीलने हा शो सोडला. तिच्या वाढत्या उंचीमुळे तिला 'तारक मेहता मधील का उलटा चष्मा' मधून काढण्यात आलं, अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. पण इतक्या वर्षांनी झीलने 'तारक मेहता मधील का उलटा चष्मा' शो सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं.
झीलने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे, 'अरे देवा, असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटते की, तारक मेहता का उल्टा चष्मा मधून माझ्या वाढत्या उंचीमुळे मला काढून टाकण्यात आलं. हे अत्यंत अपमानास्पद आहे. नाही, नाही आणि नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला शोमधून बाहेर काढले गेले नाही आणि दुसरं म्हणजे, मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून मी शो सोडला. त्यावेळी मला फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. लोकांना समजणे इतके अवघड का आहे? मला खरंच समजत नाही."