सोनू निगमने गायले या मालिकेचे शीर्षकगीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2017 7:24 AM
ज्याप्रमाणे सिनेमातील गाण्यांप्रमाणेच आता मालिकेच्या शीर्षक गीतावरही खूप मेहनत घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.मराठी मालिका असो किंवा हिंदी ...
ज्याप्रमाणे सिनेमातील गाण्यांप्रमाणेच आता मालिकेच्या शीर्षक गीतावरही खूप मेहनत घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.मराठी मालिका असो किंवा हिंदी मालिका आजही शीर्षक गीतामुळे रसिक मालिकांकडे आपसूकच वळताना दिसतो. त्यामुळे नावाजलेले गायकही सध्या मालिकांच्या शीर्षगींतावर विशेष मेहनत घेत आहेत.बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस आणि लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम याने शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या ऐतिहासिक मालिकेचे शीर्षकगीत गायले असून तिची शब्दरचना कुमार यांची आहे.‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ ही मालिका लढाईत एक डोळा गमावलेल्या आणि एकही लढाई कधी न हारलेला पंजाबचा महान राजा रणजितसिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. रणजितसिंग हे केवळ 10 व्या वर्षी सिंहासनावर बसले, परंतु त्यांनी आपल्या सत्तेचा वापर अधिकार गाजविण्यासाठी कधीच केला नाही. उलट त्यांनी नेहमीच जनतेच्या सेवेला प्राधान्य दिले. शीख साम्राज्याचे संस्थापक असलेल्या या महान राजाच्या जीवनावरील मालिकेच्या शीर्षक गीतासाठी निर्माता अभिमन्यू सिंह यांनी आपला मित्र आणि गायक सोनू निगम याची निवड केली. सोनूनेही अत्यंत आत्मीयतेने हे गीत गायले आहे.या शीर्षकगीताच्या ध्वनिमुद्रणाच्या अनुभवाविषयी सोनूने सांगितले, “‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या मालिकेसाठी मी शीर्षकगीताने मला एक विलक्षण ताकद दिली.प्रेक्षकांनाही हे गाणं ऐकताना त्या ताकदीचा अनुभव नक्कीच येईल. रयतेची सेवा करण्यात आपली कारकीर्द व्यतीत केलेल्या या राजावर हे गीत आधारित असल्याने ते श्रोत्यांच्या हृदयाला भिडेल. या गाण्याचं ध्वनिमुद्रण करणं हा अप्रतिम अनुभव होता आणि अशा सुंदर गाण्याचा मी एक भाग झालो, याचा मला आनंद वाटतो.”