Join us

हिंदी रिअ‍ॅलिटी शो जज करणार नाही सोनू निगम, जाणून घ्या असं का म्हणाला तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 7:20 PM

Sonu Nigam : सोनू निगमला वाटतं की, रिजनल शोज करणं जास्त चांगलं आहे. तो म्हणाला की, मी अचानकपणे या बंगाली शोचा भाग होण्याचा निर्णय घेतला. मला या शोकडून खूप अपेक्षा आहेत

टीव्ही आणि रिअ‍ॅलिटी (Reality Show) शोजना प्रेक्षकांचं नेहमीच भरभरून प्रेम मिळालं आहे. रिअ‍ॅलिटी शोजचा फॉर्मॅट मालिकांपेक्षा वेगळा असते. यात कॉन्ट्रोवर्सी आणि ड्रामा बघायला मिळतो. या शोमधील सेलिब्रिटींनी अनेकदा खुलासा केला आहे की, काही वेळा म्युझिक आणि सिगिंग शोमध्ये त्यांना स्पर्धकांचं खोटं खोटं कौतुक करण्यास सांगण्यात येतं. सोनू निगमने (Sonu Nigam) एकदा याबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं. सोनू निगम म्हणाला होता की, तो स्पर्धकांचं खोटं कौतुक करू शकत नाही. त्यामुळे त्याने हिंदी शोजमध्ये जाणं बंद केलं. आता तो बंगाली शो करत आहे.

सोनू निगम सध्या बंगाली रिअ‍ॅलिटी शो 'सुपर सिंगर सीजन ३' जज करत आहे. यात कुमार सानू आणि कौशिकी चक्रवर्तीही आहेत. स्वत:ला म्युझिक रिअ‍ॅलिटी शोजचा 'ग्रॅंड डॅडी' सांगणारा सोनू निगम मीडियासमोर म्हणाला की, मी म्युझिक रिअ‍ॅलिटी शोजचा ग्रॅंड डॅडी आहे. २२ वर्षाआधी मी शो होस्ट केला होता. तेव्हा टीव्हीवर कोणताही रिअ‍ॅलिटी शो नव्हता. त्यानंतर मी अनेक शोजचा भाग झालो. ज्यात मी कधी होस्ट होतो तर कधी जज. जेव्हाही कोणता हिंदीचा शो आला मला त्यांनी संपर्क केला. पण नेहमी नकार दिला.

सोनू निगमला वाटतं की, रिजनल शोज करणं जास्त चांगलं आहे. तो म्हणाला की, मी अचानकपणे या बंगाली शोचा भाग होण्याचा निर्णय घेतला. मला या शोकडून खूप अपेक्षा आहेत. मी अनेक हिंदी शो करण्यास नकार दिला. मी थकलो आहे. तेच तेच करून. मला सांगितलं जातं की, स्पर्धकांचं खोटं कौतुक करा. मला ते चांगलं नाही वाटत. माझ्या मनात आता हिंदी शोजबाबत प्रेम संपलं आहे. मी केवळ पैसे कमावण्याच्या मागे नाही. पैशांसाठी एखाद्या शोचा भाग व्हावं हे मी करू शकत नाही. त्यामुळे हिंदी शोज करत नाही.

गेल्यावर्षी २०२१ मध्ये गायक अमित कुमार आणि इंडियन आयडल १२ बाबत फार चर्चा झाली होती. अमित कुमार म्हणाले होते की, त्यांना शोमध्ये बोलवण्यात आलं आणि स्पर्धकांचं खोटं कौतक करण्यास सांगण्यात आलं. पण ते परफॉर्मन्स चांगलं झालं नव्हतं. सोशल मीडियावर यावर चांगलाच वाद पेटला होता. सोनू निगम यावर म्हणाला होता की, जज म्हणून आम्ही स्पर्धकांना काहीतरी शिकवायला जात असतो. आम्हाला स्पर्धकांना योग्य प्रतिक्रिया द्यायची असते. केवळ कौतुक करून काही होत नाही. नेहमी वाह वाह करून कसं चालणार? स्पर्धकांना हे समजलं पाहिजे की, त्यांचं काय चुकतंय. फक्त कौतुक करत राहिलो तर ते शिकणार कसे? 

टॅग्स :सोनू निगमटेलिव्हिजन