Join us

हिमेश रेशमिया या कार्यक्रमाचे करणार परीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 6:30 AM

सोनीवरील हा आगामी रिअॅलिटी शो दोन ते चौदा वर्षं वयोगटातील छोट्या गायकांसाठी असणार आहे. हा शो सुपर स्टार सिंगर्स या नावाने सुरू होत असून लवकरच त्याचे ऑडिशन्स विविध शहरात घेतले जाणार आहेत.

ठळक मुद्देप्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया आणि गायक जावेद अली हे या कार्यक्रमाचे परीक्षक असून या शोचे तिसरे जज कोण असणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सुपर डान्सर चॅप्टर 3 या कार्यक्रमाच्या यशानंतर, सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजन आता आपला नवीन रिअॅलिटी शो लॉन्च करण्यास तयार झाला आहे. सुपर डान्सर या कार्यक्रमातील सगळ्याच चिमुकल्यांचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचे खरे हिरो हे या कार्यक्रमातील बच्चेकंपनीच होती आणि त्याचमुळे याच वयोगटातील मुलांसाठी नवा रिअॅलिटी शो सोनी वाहिनी घेऊन येत आहे.

सोनीवरील हा आगामी रिअॅलिटी शो दोन ते चौदा वर्षं वयोगटातील छोट्या गायकांसाठी असणार आहे. हा शो सुपर स्टार सिंगर्स या नावाने सुरू होत असून लवकरच त्याचे ऑडिशन्स विविध शहरात घेतले जाणार आहेत.

सुपर स्टार सिंगर्स या नव्या शो चे परीक्षण बॉलिवूडमधील तीन दिग्गज करणार आहेत. या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी तीन जण असणार असून त्यातील दोन परीक्षकांची नावे नुकतीच घोषित करण्यात आलेली आहेत. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया आणि गायक जावेद अली हे या कार्यक्रमाचे परीक्षक असून या शोचे तिसरे जज कोण असणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार याबाबत देखील अद्याप काहीही माहिती वाहिनीकडून देण्यात आलेली नाहीये. या नव्या कार्यक्रमाबाबत जावेद अली खूपच उत्सुक आहे. त्याला या नव्या कार्यक्रमाबाबत विचारले असता त्याने सांगितले की, "इंडियन आयडॉल या कार्यक्रमात मी परीक्षकाची भूमिका बजावली होती. माझ्यासाठी या कार्यक्रमाचे परीक्षण करणे हा खूपच चांगला अनुभव होता. आता मी माझा नवा प्रवास सुपरस्टार सिंगर्स या कार्यक्रमाद्वारे सुरू करणार आहे. हा लहान मुलांचा रिअॅलिटि सिंगिंग शो असून 2 ते 14 वयोगटातील मुलं यात सहभागी होणार आहेत. आम्ही या कार्यक्रमासाठी लवकरच संपूर्ण भारतात ऑडिशन्स घेणार आहोत आणि अनेक चांगले स्पर्धक लोकांसमोर आणणार आहोत. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला कधी सुरुवात होईल याची मी आतुरतेने वाट पाहात आहे."

टॅग्स :हिमेश रेशमियाजावेद अली