Join us

आता दीड तास पाहता येणार 'गाथा नवनाथांची'; मालिकेच्या वेळेत झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 8:30 AM

Gatha navnathanchi: 'गाथा नवनाथांची' आणि 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकांनी अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या मालिका आता दीड तास प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. 

ठळक मुद्देयेत्या २५ ऑक्टोबरपासून या दोन्ही मालिका प्रेक्षकांना दीड तास पाहता येणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' आणि 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकांनी अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पौराणिक कथांचा उलगडा होत आहे. त्यामुळे या मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं दिसून येत आहे. या मालिका दररोज १ तास प्रेक्षकांचं  मनोरंजन करण्यासोबतच त्यांच्या ज्ञानात भर घालत आहेत. विशेष म्हणजे आता प्रेक्षकांचा वाढता कल लक्षात घेता या मालिकांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मालिका आता दीड तास प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. 

येत्या २५ ऑक्टोबरपासून या दोन्ही मालिका प्रेक्षकांना दीड तास पाहता येणार आहे. त्यामुळे या मालिका ६.३० ते ८ या वेळात लागणार आहेत. या दीड तासात 'गाथा नवनाथांची' मालिकेत मच्छिन्द्रनाथांचे स्त्री राज्यात आगमन होणार असून राज्यातल्या स्त्रियांच्या मनात नाथांबद्दलची कुतूहलता दिसून येणार आहे. लवकरच मैनावतीचा नाथांशी विवाह होणार असल्याचीही शक्यता आहे. मैनावतीने पाठवलेल्या गोष्टी नाथ स्वीकारणार का?, मैनावतीने जाहीर केलेल्या उत्सवाला नवीन वेश परिधान करून जाणार का?; याची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत. मालिकेत मोठ्या गोरक्षनाथांचा प्रवेशही होणार आहे. गुरू संकटात आहेत आणि त्यांना शोधून त्या संकटातून सोडवलं पाहिजे या हेतूने गोरक्षनाथांचा प्रवास सुरू होताना दिसणार आहे.

तर दुसरीकडे,  'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत माउली आणि त्यांची भावंडं यांचा आई-वडिलांच्या देहान्त प्रायश्चित्तानंतरचा खडतर प्रवास सुरू होणार आहे. मुक्ताई आजारी पडल्यावर तिच्यासाठी सप्तपर्णीचे वेल आणण्यासाठी माउली स्वतः निबिड अरण्यात जाणार आहेत. तिथे त्यांचा सापाशी सामना होणारा. माउलींना स्फुरलेला दिवाळी अभंग, त्यांनी साजरी केलेली दिवाळी, शुद्धिपत्रासाठी सुरू झालेली पैठण यात्रा आणि माउलींकडून झालेली हरिपाठाची निर्मिती; असे अनेक अनोखे प्रसंग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार