Join us

'खुशियोवाली फिलिंग', सोनी सबचं आनंद वाटणारं कॅम्पेन प्रेक्षकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:43 IST

हास्य फुलवणाऱ्या मालिका सोनी सबवर दररोज पाहायला मिळतात. त्याच्याच एक पाऊल पुढे जात जाहिरातीच्या स्वरूपातील या कॅम्पेनअंतर्गत 60 सेकंदांचा व्हिडीओ दाखवण्यात येतोय.

मुंबईः सोनी पिक्चर नेटवर्कची हिंदी वाहिनी असलेल्या सोनी सब नवं कॅम्पेन घेऊन आली आहे. जेवढा मनुष्याचा आनंद वाढतो, तेवढीच जगात माणुसकी वाढत जाते, अशा भावनेतून 'सोनी सब'ने हे नवं कॅम्पेन प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. 'खुशीयोवाली फिलिंग' या टॅगलाइनअंतर्गत हे कॅम्पेन प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. 

हास्य फुलवणाऱ्या मालिका सोनी सबवर दररोज पाहायला मिळतात. त्याच्याच एक पाऊल पुढे जात जाहिरातीच्या स्वरूपातील या कॅम्पेनअंतर्गत 60 सेकंदांचा व्हिडीओ दाखवण्यात येतोय. 'खुशीयोवाली फिलिंग' या टॅगलाइनअंतर्गत प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात सोनी सबनं 60 सेकंदांचे तीन व्हिडीओ दाखवले आहेत. त्यात मनुष्याला दररोजच्या धकाधकीच्या जीवनात कशा प्रकारे आनंद मिळवता येईल हे दाखवलं आहे.  सोनी सबच्या तारक मेहता का उल्टा चष्मा, तेनाली रामा या हास्य फुलवणाऱ्या मालिकांनी नुकतेच 500 भाग पूर्ण केले आहेत. अल्लाहुदीन-नाम तो सुना होगा, जिजाजी छत पर है आणि भाकरवाडीसारख्या मालिकांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. सोनी सब, पल आणि सोनी मॅक्स मूव्हीजचे व्यवसाय प्रमुख नीरज व्यास यांच्या संकल्पनेतून हे कॅम्पेन राबवलं जात आहे. घरबसल्या प्रेक्षकांच्या स्वभावाच्या लहरी बदलण्यासाठी हे नवं कॅम्पेन फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :टेलिव्हिजनसोनी सब