Join us

पुन्‍हा रसिकांच्या भेटीला येत आहे सुपरहिट मालिका 'ऑफिस ऑफिस' !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 5:35 PM

लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये संपूर्ण जग तणाव, वेदना व दु:खाचा सामना करत असताना 'ऑफिस ऑफिस'चे पुनर्प्रसारण त्‍यांचे लक्ष दुसरीकडे वळवत त्‍यांच्‍या चेह-यांवर हास्‍य आणेल. मी स्‍वत: ही मालिका पाहण्‍यासाठी अत्‍यंत उत्‍सुक आहे.''

मुस्‍सद्दी लाल त्रिपाठी ऊर्फ सामान्‍य माणसाची भूमिका साकारणारा पंकज कपूर आणि ऑफिस स्‍टाफ उषा मॅडमच्‍या भूमिकेत आसावरी जोशी, शुक्‍लाच्‍या भूमिकेत संजय मिश्रा, पटेलच्‍या भूमिकेत देवेन भोजानी, भाटियाच्‍या भूमिकेत मनोज पाहवा, पांडेजीच्‍या भूमिकेत हेमंत पांडे आणि टिनाच्‍या भूमिकेत ईवा ग्रोव्‍हर हे पुन्‍हा एकदा कुठेच दिसण्‍यात न आलेल्‍या अशा खास कार्यालयीन संस्‍कृतीसह तुमचे मनोरंजन करण्‍यासाठी परतले आहेत. हे प्रेमळ कार्यालयीन कर्मचारी पुन्‍हा एकदा टेलिव्हिजनवर हास्‍यपूर्ण मनोरंजन सादर करताना दिसणार आहेत १३ एप्रिलपासून दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६ वाजता आणि रात्री १०.३० वाजता तुमचे मनोरंजन करण्यासाठी कलाकारा पुन्हा सज्ज झाले आहेत.

सर्व पिढ्यांसाठी विनोदी मालिका आणि भारताची सर्वात आयकॉनिक मालिका मानली जाणारी 'ऑफिस ऑफिस' मुस्‍सदीलाल आणि त्‍यांच्‍या संघर्षांच्‍या अवतीभोवती फिरते. त्‍याला त्रासदायक, पण मनोरंजनपूर्ण व अद्वितीय पात्रे असलेल्‍या कर्मचा-यांनी भरलेल्‍या एका कार्यालयामधून त्‍याचे काम करून घेण्‍यासाठी नोकरशाही अडथळ्यांचा सामना करावा लागतो. 

२००१ मध्‍ये प्रसारित करण्‍यात आलेल्‍या या मालिकेने हलक्‍या-फुलक्‍या स्‍वरुपात तयार करण्‍यात आलेल्‍या एपिसोडिक कथा आणि वर्षानुवर्षे आपल्‍या खास शैली अबाधित राखलेल्‍या विविध पात्रांसह विनोदीशैलीमधील नवीन लुकला सादर केले होते. प्रत्‍येक पात्रासाठी भूमिका परिपूर्णपणे लिहिण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यांचे ट्रेडमार्क 'तकिया कलाम्‍स', जसे उषा मॅडमचे 'वही तो' आणि पटेलजीचे 'दो बातें' खूपच लोकप्रिय ठरले होते. भाटियाची भूमिका साकारणारे मनोज पाहवा म्‍हणाले, ''तुम्‍ही मालिकेसाठी अथक मेहनत घेतली आहे, तसेच ती मालिका सुपरहिट देखील ठरली आहे अशी मालिका पुन्‍हा एकदा प्रेक्षकांच्‍या मनोरंजनासाठी सोनी सबवर सादर केली जात असल्‍याचे ऐकून खूपच चांगले वाटत आहे. ही मालिका ज्‍यांना आवडली होती, ते जुन्‍या काळाला निश्चितच उजाळा देतील आणि ज्‍यांनी ही मालिका पाहिली नसून फक्‍त मालिकेबाबत ऐकले होते, त्‍यांना आता मालिका पाहायला मिळणार आहे. ते अत्‍यंत खास दिवस होते आणि या मालिकेसाठी प्रतिभावान कलाकारांच्‍या समूहासोबत शूटिंग करण्‍याचा अनुभव देखील खूपच चांगला होता. माझे संपूर्ण टीमसोबत खूपच चांगले संबंध होते. मला विशेषत: आमचे सीनियर पंकज कपूर यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळाले आहे. संपूर्ण टीममध्‍ये सलोख्‍याचे नाते होते आणि आम्‍ही सेटवर येण्‍याची वाटच पाहायचो. तसेच आम्‍ही शूटिंगच्‍या वेळी खूप धमाल करायचो. त्‍या खूपच गोड व संस्‍मरणीय आठवणी आहेत.'' पांडेजीची भूमिका साकारणारे हेमंत पांडे म्‍हणाले, ''माझ्या मनाच्‍या खूप जवळ असलेली मालिका पुन्‍हा एकदा सोनी सबवर सादर केली जाणार असल्‍यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 'ऑफिस ऑफिस' मालिका पुन्‍हा सादर करण्‍याची वेळ अगदी योग्‍य आहे. या आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये कुटुंबे एकत्र येऊन फक्‍त आनंद व हास्‍य देणारी ही मालिका पाहू शकतील. माझे सहकारी पटेलजी म्‍हणायचे की 'अब तो दो बातें होगी', अगदी त्‍याप्रमाणेच ही मालिका एकतर लोकांना जुन्‍या आठवणींमध्‍ये घेऊन जाईल आणि तरूणांना देखील अभूतपूर्व विनोदीशैलीचा अनुभव देईल. माझ्या या मालिकेशी जुडलेल्‍या सुंदर आठवणी आहेत. मी देखील पुन्‍हा एकदा 'ऑफिस ऑफिस' मालिका पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. त्‍याकाळी मालिकेला भरघोस प्रेम व पाठिंबा मिळाला होता आणि आजही मालिकेच्‍या कथा चालू घडामोडींशी संबंधित आहेत. 'ऑफिस ऑफिस' मालिकेने क्‍लासिक विनोदीशैलीची निर्माण केली, जी कधीच जुनी होणार नाही. मी या मालिकेच्‍या माध्‍यमातून माझ्या जुन्‍या आठवणींना उजाळा देण्‍यासाठी उत्‍सुक आहे.'' 

पटेलची भूमिका साकारणारे देवेन भोजानी म्‍हणाले, ''मला खूप आनंद झाला आहे, कारण माझ्या दोन मालिका 'भाखरवडी' आणि 'ऑफिस ऑफिस' आता सोनी सब या एकाच चॅनेलवर प्रसारित केल्‍या जाणार आहेत. 'ऑफिस ऑफिस' मालिका परतत असल्‍यामुळे मला खूपच चांगले वाटत आहे. आम्‍ही २००१-२००२ दरम्‍यान ही मालिका केली होती. जवळपास २ दशकांनंतर ही मालिका पुन्‍हा एकदा प्रसारित होणार आहे. ही मालिका आजही त्‍या काळाप्रमाणेच संबंधित आहे. एका सामान्‍य माणसाला भ्रष्‍टाचारी कर्मचा-यांच्‍या कार्यालयांमध्‍ये महत्त्वाचे काम करून घेण्‍यासाठी कराव्‍या लागणा-या संघर्षांना या मालिकेमध्‍ये दाखवण्‍यात आले आहे. लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये संपूर्ण जग तणाव, वेदना व दु:खाचा सामना करत असताना 'ऑफिस ऑफिस'चे पुनर्प्रसारण त्‍यांचे लक्ष दुसरीकडे वळवत त्‍यांच्‍या चेह-यांवर हास्‍य आणेल. मी स्‍वत: ही मालिका पाहण्‍यासाठी अत्‍यंत उत्‍सुक आहे.''  

टॅग्स :पंकज कपूर