Join us

क्राईम पट्रोलचा 'श्रद्धा वालकर' एपिसोड डिलीट; 'सोनी'ने माफी मागत दिलं स्पष्टीकरण; युझर्स आणखी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 12:05 PM

सोनी टीव्हीने  'क्राईम पेट्रोल'च्या (Crime Petrol) एका एपिसोडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच गोष्ट दाखवली आणि सोनी टीव्हीवर लोक संतापले.

Sony Tv : गेल्या वर्षात कोणत्या एका घटनेने हादरवून सोडलं असेल तर ते आहे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण (Shraddha Walkar Murder Case). जवळपास ७ महिन्यांपूर्वीच आफताब पुनावालाने गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरचे तुकडे करुन जंगलात फेकले. या प्रकरणाचा तपास अजुनही सुरुच आहे. तर दुसरीकडे सोनी टीव्हीने  'क्राईम पेट्रोल'च्या (Crime Petrol) एका एपिसोडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच गोष्ट दाखवली आणि सोनी टीव्हीवर लोक संतापले. हा वाद एवढा वाढला की आता सोनीने माफी मागत तो एपिसोड डिलीट केला आहे. 

'सोनी टीव्ही'वर दाखवण्यात आलेल्या एपिसोड मध्ये मुलगा हिंदू दाखवला असून मुलगी ख्रिश्चन दाखवण्यात आली आहे. आफताबने ज्याप्रकारे श्रद्धाची हत्या केली अगदी तशीच घटना एपिसोड मध्ये दाखवण्यात आली आहे. यावरुन लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रेक्षक म्हणाले, मेकर्सने श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ना फक्त मोडतोड करुन दाखवले पण यातील नावंही बदलले. हा एपिसोड ट्विटरवर व्हायरल झाला. सोनी वाहिनी बॉयकॉट करण्याचीही मागणी होऊ लागली. हिंदूंना जाणूनबुजून बदनाम करण्यात आल्याने संघटना आक्रमक झाल्या.

सोनीने मागितली माफी

सोनी वाहिनीने घडलेल्या प्रकाराबाबत लिहिले, 'क्राईम पेट्रोलच्या नुकताच प्रसारित केलेला एक एपिसोड सध्या चर्चेत असलेल्या एका घटनेशी मिळताजुळता आहे. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की, एपिसोडमध्ये दाखवलेली गोष्ट ही २०११ च्या एका घटनेवरुन घेतलेली आहे. याचा सध्याच्या घटनेशी संबंध नाही. प्रसार माध्यमांसाठी घातलेल्या नियमांच्या अधीन आम्ही काम करु याची खात्री देतो. प्रेक्षकांची नाराजी बघता आम्ही हा एपिसोड काढत आहोत, जर या एपिसोडमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो. 

सोनीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रेक्षक आणखी संतापले. २०११ मध्ये अशी कोणती घटना घडली होती ज्यात हिंदू मुलाने ख्रिश्चन मुलीची अशी हत्या केली याचे स्पष्टीकरण द्या असे सोनीला सुनावले. आफताब हिंदू आणि श्रद्धाला ख्रिश्चन दाखवल्यावरुन प्रेक्षक जास्त खवळले.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात सध्या आफताब तुरुंगात आहे. मात्र त्याने केलेला गुन्हा अद्याप कोर्टात सिद्ध झालेला नाही. तसेच श्रद्धा वालकरच्या अवयवांचे तुकडेही पोलिसांना मिळालेले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण अजुनच किचकट होत चालले आहे. त्यात क्राईम पट्रोलने या घटनेशीच मिळताजुळता एपिसोड दाखवल्याने प्रेक्षक संतापले. 

टॅग्स :श्रद्धा वालकरक्राइम पेट्रोल