लवकरच ‘जिंदगी के क्रॉसरोड्स’ प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 5:31 AM
आपल्या जीवनात आपण दररोज काहीतरी निवड करत असतो आणि काही निर्णय घेत असतो. यापैकी बरेचसे निर्णय साधेसुधे असतात, तर ...
आपल्या जीवनात आपण दररोज काहीतरी निवड करत असतो आणि काही निर्णय घेत असतो. यापैकी बरेचसे निर्णय साधेसुधे असतात, तर काही त्यापेक्षा थोठे कठीण असतात. काही निर्णय मात्र असे असतात की ते एकदा घेतले की त्यांचा प्रभाव कधीच नष्ट होत नाही आणि एक व्यक्ती म्हणून तुमच्या चरित्राची ओळख ते करून देतात. हे असे निर्णय असतात जे तुम्ही जीवनाच्या चौरस्त्यावर उभे राहून घेतलेले असतात, जाच्यांमुळे तुमच्या जीवनाला दिशा मिळालेली असते आणि त्यांच्यामुळे केवळ तुमच्याच जीवन प्रवासाचा मार्ग नाही तर तमुच्या अगदी जवळच्या माणसांचा मार्गदेखील बदलून गेलेला असतो. कधी कधी चौरस्त्यावर उभे राहून घेतलेले हे निर्णय इतरांच्यावतीने आपण घेतलेले असतात पण ते घेण्याची जबाबदारी तुमच्या शिरी आलेली असते. असे निर्णय कसे घेतले जातात आणि त्यांचा स्वीकार कसा केला जातो? 'जिंदगी के क्रॉसरोड्स’ या आपल्या शोमधून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन असेच प्रश्न विचारणार आहे व त्या प्रश्नांची उत्तरे देखील देणार आहे.भारतातील प्राइम टाइम टेलिजिव्हजनवर प्रथमच या प्रकारचा फॉरमॅट सादर होणार आहे, ज्यात जीवनाच्या नट्यातून प्रेरित होऊऩ आयुष्याला नवीन वळण देणारा आपला वाटेल असा कार्यक्रम सादर होणार आहे, आणि ‘क्रॉसरोड’ निर्णय घेतला जाण्यापूर्वी तो प्रश्न देशाचे प्रतिनिधत्व करणाऱ्या या स्टुडिओतील प्रेक्षकांपुढे विचारार्थ मांडला जाईल आणि आपल्यापैकी बऱ्याच जणाांनी त्या परिस्थितीत काय केले असते, हे जाणून घेतले जाईल. प्रेक्षकांसाठी हा अंतर्मुख करणारा आरसा असेल तर काहींना तो भविष्यातील समस्यांना तोंड देताना सक्षम करणारा अनुभव असले. 'जिंदगी के क्रॉसरोड्सच्या प्रत्येक भागात एक नवीन गोष्ट असेल आणि त्यातील नायकपढुे असलेले प्रश्न स्टुडिओतील प्रेक्षकांपुढे चर्चेसाठी ठेवण्यात येतील. लोकप्रिय टेलिजिव्हजन अभिनेता राम कपूर या कार्यक्रमाचे सत्रूसचांलन करणार आहे. तो प्रेक्षकांना त्यांचे मत मांडण्यासाठी तर प्रोत्साहन देईलच पण त्याचबरोबर त्या निर्णयामागील कारणदेखील काढून घेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरुन प्रस्तूत कथेसाठी प्रेक्षकांच्या अनेक शक्यता दर्शवणाऱ्या गोष्टी समोर येतील. भारतीय चित्रपटाताशी निगडित असलेल्या शबिना खान या कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत.