Join us

राधिकाने तिच्या रिअल लाइफ 'गुरु'कडून मागितले हे खास गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 8:29 AM

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका सध्या तुफान गाजतेय.या मालिकेतील कथानक रंजक वळणावर आहे.शनायावर लट्टू झालेल्या आपल्या पतीला ...

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका सध्या तुफान गाजतेय.या मालिकेतील कथानक रंजक वळणावर आहे.शनायावर लट्टू झालेल्या आपल्या पतीला म्हणजेच गुरुनाथ सुभेदारला धडा शिकवण्याचा चंग सध्या राधिकानं बांधला आहे.त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.मालिकेत राधिकाचा नागपुरी ठसका आणि शनायासह तिची होणारी जुगलबंदी रसिकांना चांगलीच भावते आहे.सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा दिवाळी सण उत्साहात साजरी करत आहेत.यांत राधिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता दाते-केळकर  सुद्धा दिवाळी साजरी करतेय.दिवाळीत प्रत्येकाला भेटवस्तू स्वीकारण्यास आवडतं.आपल्या आवडत्या व्यक्तींकडून किंवा कुणाकडूनही ही सरप्राईज भेट मिळाली तर दिवाळी ख-या अर्थाने स्पेशल ठरते.मात्र अभिनेत्री अनिता दाते हिला सरप्राईज नाही तर जे आपल्याला आवडतं ते हक्काने मागते.मग ते आपले आई-वडिल असो किंवा पती, कुणाकडेही अनिता हक्काने गिफ्ट मागते.यंदाच्या दिवाळीत पाडव्यानिमित्त अनिताने तिच्या पतीकडे म्हणजेच चिन्मयकडे कॉस्मेटीक्सने भरलेली मेकअप व्हॅनिटी मागितली आहे.हे गिफ्ट आपल्याला पतीकडून मिळणारच असा विश्वासही अनिताला आहे.पतीकडून हक्काने गिफ्ट मागणारी अनिता पतीलाही विशेष गिफ्ट देणार आहे. आपण कधीच एकमेंकांना कपडे,सोनं अशा भेटवस्तू देत नाहीत असं अनिताने म्हटले आहे.चिन्मयची वाचनाची आवड लक्षात घेऊन त्याला सर्व दिवाळी अंक एकत्र करुन भेट देणार असल्याचे अनिताने सांगितले आहे. दिवाळीच्या दिवसात घरोघरी फराळ असतो.'माझ्या नव-याची बायको' मालिकेत मसाले तयार करुन विकणारी राधिका म्हणजेच अनिता दिवाळीत स्वतः फराळ बनवत नाही.फराळ बनवण्यापासून दूर राहत असल्याचे ती सांगते.शूटिंगचं बिझी शेड्युल असल्याने फराळ बनवण्यासाठी वेळ नसतो.त्यामुळे हे काम आई किंवा सासू करतात असं ती सांगते.Also Read: फोटोत दिसणारी कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री,जिचा लूक ठरतोय लक्षवेधी