Join us

दिल ही तो है या मालिकेतील कलाकारांसाठी केली जाणार ही खास स्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:21 PM

दिल ही तो है या मालिकेत लवकरच सेतू (अश्मिता सूद) आणि रोहित (कृष्ण शेट्टी) यांच्या साखरपुड्याचा भव्य सोहळा होणार आहे.

दिल ही तो है ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळत आहे. या मालिकेत लवकरच सेतू (अश्मिता सूद) आणि रोहित (कृष्ण शेट्टी) यांच्या साखरपुड्याचा भव्य सोहळा होणार आहे. भारतीय संस्कृतीत सणवार, लग्न यांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक सण अतिशय धामधुमीत साजरा केला जातो. लग्न देखील गाजावाजात केले जातात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दिल ही तो है मालिकेत लवकरच असेच काहीसे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सण, लग्न म्हटले की, नवीन आणि सुंदर कपडे हे आलेच... या मालिकेची स्टायलिस्ट फॅशन डिझाईनर अनुराधा खुरानाने या भागांसाठी काही उत्तम डिझाईन्स केली आहेत.गेल्या तीन ते चार वर्षांपासून बालाजी टेलिफिल्म्सशी निगडीत असलेल्या अनुराधाने अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्व कलाकारांचे स्टायलिंग केलेले आहे. दिल ही तो है च्या कलाकारांसाठी काम करण्याचा तिचा अनुभव छान आहे आणि एकता कपूरचे नाव ज्या मालिकेशी संलग्न आहे, त्याचे स्टायलिंग भव्यच असायला हवे. या मालिकेने कमी अवधीत खूप लोकप्रियता मिळवली आहे आणि लवकरच ही मालिका लीप घेणार आहे. या नावीन्यपूर्ण कथानकात प्रेक्षक सेतू आणि रोहित यांचा पडद्यावरील साखरपुडा पाहणार आहेत. पोषाखांपासून ते दागिन्यांपर्यंत सगळे भव्य असणार आहे. याविषयी अनुराधा सांगते, “या मालिकेत आम्हाला लग्नसोहळा अतिशय मोठा दाखवायचा होता. यश राज किंवा करण जोहरच्या चित्रपटांसारखे भव्य दिव्य समारंभ आम्हाला दाखवायचे होते. सेतू आणि रोहित या जोडप्यातील स्नेहबंध दाखवण्यासाठी मी त्या दोघांच्या पोशाखांचे रंग एकमेकास अनुरूप ठेवले होते, ज्यामुळे पडद्यावर ते अभिजात दिसतील. विजयपथ ही गडगंज श्रीमंत अशी व्यक्तिरेखा आहे. त्याला स्टाइल देताना मला अमिताभ बच्चनलाच मनात ठेवून काम केले पाहिजे. राजेश्वरीसाठी साधा पोशाख ठेवला. एका साध्याशा साडीमुळे मालिकेतील तिची व्यक्तिरेखा आणि शालिनता उठून दिसू शकेल.”दिल ही तो है या मालिकेतील ही स्टाईल प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे.