'स्वामिनी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे (Surabhi Bhave). अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सुरभीचा चाहता वर्गही मोठा आहे. सुरभी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळते. नुकतेच तिने वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सुरभी भावेने इंस्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले की, बाबा, आज तुम्हाला जाऊन २२ वर्ष झाली... मी १४-१५ वर्षांची होते तेव्हा... तुमच्या असण्यापेक्षा "नसण्याला" जास्त वर्ष झाली आहेत... पण आजही बाबा असं नुसतं म्हंटलं तरी तुमच्या आठवणीने डोळे पाणावतात, गळा दाटून येतो... काय म्हणू, सगळं माहीत आहेच तुम्हाला ,आहात सतत माझ्या बरोबर माझ्या सावलीसारखे ...आता फक्त २ नवीन जीव ऍड झाले आहेत, रिआन आणि सान्वी. ते दोघे तुमच्याकडून लाड करून घ्यायला मुकलेत...
ती पुढे म्हणाली की, सानु अगदी बाबासारखी आहे तिच्या, पण खरं सांगू आपला बॉण्ड मला माहित आहे सो आई म्हणून मी जलस नाही होणार ( असं माझं मी ठरवलं आहे). रिआन कधी कधी अगदी तुमच्या सारखा रिअॅक्ट होतो ,काही सवयी पण तुमच्यासारख्या आहेत... गुणी लेकरं आहेत दोघेही... त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवायची सुबुद्धी आम्हाला द्या ... तुम्ही असतात तर अनेक गोष्टी नव्या उत्साहात घडल्या असत्या, तुम्ही असतात तर खूप गोष्टी बघण्याचा दृष्टिकोन बदलला असता ...बाबा, अनेक वेळा तुम्हाला कडकडून मिठी मारावीशी वाटते, २२ वर्षात तुम्हाला मिठी नाही मारली, तुमचा आवाज नाही ऐकला, तुम्हाला पाहिलं सुद्धा नाहीये..इतका काळ लोटला असला तरी आपण केलेली धमाल, मस्ती आपलं बॉंडिंग स्वच्छ आठवतं मला... त्या आठवणींवर २२ वर्ष काढली आणि खूप स्ट्रॉंग बनत गेले...दमते ,थकते पण पुन्हा उभी राहते कारण तुम्हीच माझी खरी ताकद आहात. आपण कुणाच्या वाईटासाठी कारण बनू नये ही शिकवण पावलोपावली जपते मी, ..काहीही झालं तरी तुमच्या आणि आई च्या नावाला धक्का लागेल असं कधीच करणार नाही ...
सुरभीने बाबांसाठी लिहिली कविता
पुढे सुरभीने बाबांसाठी एक कवितादेखील लिहिली, बाबा, माझं अस्तित्व, माझं आयुष्य, माझा आत्मविश्वास, माझी प्रेरणा, पहिला शब्द बाबा, पहिला मित्र बाबा, स्वतः नसूनसुद्धा माझ्यात उरलेला बाबा, माझं बोलणं, माझं हसणं तुमचाच सारखं आहे ना बाबा, माझी काया पण त्यात त्याचीच माया, त्यांचेच छत्र आणि त्यांचीच छाया, माझी संवेदना तुमच्या स्मृती, काळाचे चक्र त्याचीच गती, माझा जाब नियतीचा जवाब, सारं काही घुटमळतंय तुमच्याच भोवती । पावसाचा गारवा तुम्ही ।विजेचे तेज तुम्ही, आठवणीच्या बरसाती मधला हळुवार तुषार सुद्धा तुम्हीच, तुम्ही होतात म्हणूनच मी, पण आता माझ्यातही तुम्हीच ।।।