Join us

Spruha Joshi : सिनेमा, वेब सिरीज, सूत्रसंचालन आणि आता पुन्हा मालिका; स्पृहा जोशीने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:42 AM

अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा सर्वच भुमिका अगदी चोख बजावणारी स्पृहा जोशी तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर येत आहे.

Spruha Joshi :  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर एक नवी कोरी  मालिका सुरु झाली आहे ती म्हणजे 'लोकमान्य' (Lokmanya) भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे  प्रणेते लोकमान्य  गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही मालिका आधारित आहे. अभिनेता क्षितिज दाते (Kshitij Date) मालिकेत लोकमान्य यांची भुमिका साकारत आहे तर अभिनेत्री स्पृहा जोशी त्यांच्या पत्नीच्या भुमिकेत आहे.

स्पृहा जोशीचे मालिकेकडे का वळाली ? 

अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा सर्वच भुमिका अगदी चोख बजावणारी स्पृहा जोशी तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर येत आहे. लोकमान्य या मालिकेत ती लोकमान्यांच्या पत्नीच्या भुमिकेत दिसत आहे. वेब सिरीज, सिनेमा यामध्ये व्यस्त असणारी स्पृहा अचानक परत मालिकेत कशी काय येत आहे असा प्रश्न पडला असेल ना. तर यावर स्पृहा म्हणाली, ' गेल्या काही वर्षांत मी वेगवेगळ्या पद्धतीचे काम केले. वेबसिरीजमध्ये काम केले, कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन केलं, सिनेमे केले पण टीव्ही हे असं माध्यम आहे ज्यामुळे तुम्ही प्रेक्षकांच्या थेट घरात पोहोचता. टीव्हीची पोहोच मोठी आहे. ही जी भुमिका मी करत आहे ती टीव्हीच्या  माध्यमातून करायला मिळते याचा आनंद वाटतो.  हा विषय अतिशय जाणीवपूर्वक, जबाबदारीने आणि सत्यता पडताळून केला जाईल याची मला खात्री आहे.मी लेखकांवर पूर्ण विश्वास ठेवून ही भुमिका करण्याचा प्रयत्न करत आहे.

स्पृहाने यापूर्वी 'उंच माझा झोका' या ऐतिहासिक मालिकेत काम केले होते. यात तिने रमाबाई रानडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. आता पुन्हा एकदा स्पृहाला ऐतिहासिक मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. “लोकमान्य” २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. झी मराठी वाहिनीवर सुरु झाली आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतालोकमान्य टिळकमराठीस्पृहा जोशी