Join us  

'अंगारो सा' गाण्यावर थिरकली स्पृहा जोशी, मराठी ठसका दाखवत श्रीवल्लीला दिली टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:20 AM

अनेक सेलिब्रिटींनाही 'अंगारो सा' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीचा व्हिडिओ समोर आला आहे.

अल्लू अर्जुन मुख्या भूमिकेत असलेल्या 'पुष्पा' सिनेमाच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा दुसरा भाग 'पुष्पा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २' प्रदर्शित होण्याआधीच त्यातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील 'अंगारो सा' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. पुष्पा आणि श्रीवल्लीच्या या गाण्याने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनाही 'अंगारो सा' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. 

अनेक मराठी कलाकारांनी 'अंगारो सा' गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीचा व्हिडिओ समोर आला आहे. स्पृहादेखील अंगारो सा गाण्यावर थिरकली आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्पृहाने फ्युजन गाण्यावर रिल व्हिडिओ बनवला आहे. 'अंगारो सा' आणि 'एक लाजरान साजरा मुखडा' हे फ्युजन गाणंही सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यावर स्पृहाने व्हिडिओ बनवला आहे. सुरुवातीला 'अंगारो सा' गाण्यावर स्पृहा अगदी कॅज्युअल लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिने हुक स्टेप्सही केल्या आहेत. 

त्यानंतर या व्हिडिओत स्पृहाचा मराठमोळा ठसका पाहायला मिळत आहे. गुलाबी रंगाच्या साडीत स्पृहा 'एक लाजरान साजरा मुखडा' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओत तिने शेवटी पुष्पा स्टाइलमध्ये स्वॅग दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. स्पृहाचा हा फ्युजन डान्स चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान, सध्या स्पृहा 'सुख कळले' या छोट्या पडद्यावरील मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. स्पृहाने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमधून काम केलं आहे. 'उंच माझा झोका', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'अग्निहोत्र', 'लोकमान्य' या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या. स्पृहाने 'सूर नवा ध्यास नवा' या शोचं सूत्रसंचालन देखील केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच स्पृहा उत्तम लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे. 

टॅग्स :स्पृहा जोशीटिव्ही कलाकार