Join us

१३ वर्षांपूर्वी अशी दिसायाची स्पृहा जोशी, अभिनेत्री शेअर केला फोटो, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 17:33 IST

आपल्या आवडत्या कलाकाराबाबतच्या सर्व गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. सोशल मीडियावर स्पृहा जोशीचा मोठा चाहता वर्ग आहे.

मराठी अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा अनेक भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi ). तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. दमदार अभिनयाच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.तब्बल आठवर्षानंतर तिने लोकमान्य या मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसतेय. अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे जो तिच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. जो अभिनेत्रीचे आधी कशी दिसायची हे पाहण्यासाठी आतुर असतो.

 स्पृहाने तिचा १३ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्पृहा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. नुकतंच स्पृहाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या कॉलेजच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. तिने तिचा २०१० मधील फोटो शेअर केला आहे.

स्पृहा या फोटोत पिवळ्या रंगाची साडी नेसून बसलेली दिसतेय. फोटोत ती स्मितहास्य करताना दिसतेय. तिने शेअर केलेला हा फोटो २०१० मधील आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “कॉलेजमधील दिवस, २०१०, या आठवणीसाठी गुगलचे धन्यवाद”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

टॅग्स :स्पृहा जोशी