ओजस्वी अरोराची आदर्श श्रीदेवी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 10:28 AM
‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकाररणारी ओजस्वी अरोरा श्रीदेवी यांची मोठी चाहती आहे.या मालिकेतील आपल्या ...
‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकाररणारी ओजस्वी अरोरा श्रीदेवी यांची मोठी चाहती आहे.या मालिकेतील आपल्या अभिनयाने ओजस्वीने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.ओजस्वी ही श्रीदेवीची कट्टर चाहती असून ती तिचा एकही चित्रपट पाहण्याचे चुकवत नाही. पूर्वी ती श्रीदेवीचे चित्रपट पाहून त्यातील प्रसंग स्वत: साकार करायची. तसेच श्रीदेवीच्या चेहर््यावरील बोलके एक्सप्रेशन टिपून घेत. तिने श्रीदेवीप्रमाणेच शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले असून ती कथ्थक, मयूरभंज छाव आणि आधुनिक नृत्यांत पारंगत आहे. ती सेटवरही याबद्दल वारंवार चर्चा करताना आढळते. श्रीदेवी आणि ओजस्वी यांच्यात आणखी एक साम्य आहे; ते म्हणजे ओजस्वीलाही श्रीदेवीप्रमाणेच टपोर््या डोळ्य़ांची देणगी लाभली असून त्याद्वारे ती मालिकेतील परी या व्यक्तिरेखेचा खट्य़ाळपणा आणि प्रेम व्यक्त करते.तिच्या श्रीदेवीप्रेमाबद्दल ओजस्वीला विचारले असता ती म्हणाली, “श्रीदेवी ही माझी आदर्श आहे. त्याची कारणंही बरीच आहेत. मी तिचा एकही चित्रपट पाहण्याचं सोडत नाही. सूक्ष्मपणे निरीक्षण करते आणि स्वत: त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते. तिच्याबरोबरर एकत्र काम करणं हे माझं स्वप्न असून मला तिची भेट घेण्याची तीव्र इच्छा आहे.”क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेत एक आई आपल्या मुलाला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळावी यासाठी देवाकडे नवस करते. पण एका मुलीत सगळेच गुण नसल्याने देवाच्या आशीर्वादामुळे तिच्या मुलाचे लग्न पाच मुलींशी होते आणि तिथून सुरू होते या मालिकेत खरी धमाल-मस्ती.क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेची निर्मिती विपुल डी शाह यांनी केली असून या मालिकेत कांचन गुप्ता आणि मनिंदर सिंग यांची मुख्य भूमिका आहे. तसेच या मालिकेतील माणसाने शिकणे कधी थांबवू नये, असे म्हणतात.हाल, मिस्टर पांचाळ?’ या नव्या मालिकेत प्रेमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रीना अगरवाल ही या भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यासाठी सर्व ते प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणजे ती त्यासाठी फ्रेंच भाषा शिकत आहे.या मालिकेतील सारे संवाद बहुतांशी फ्रेंच भाषेतून असल्याने तिने ही भाषा शिकण्यासाठी एक फ्रेंच शिक्षक नेमला होता.