Join us

“नवरा असावा तर” या कार्यक्रमाने पूर्ण केला ५० भागांचा टप्पा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 8:52 AM

नवऱ्यासाठी त्याची बायको ही त्याला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती असते. आता याच प्रिय व्यक्तीचं म्हणजेचं बायकोचं ...

नवऱ्यासाठी त्याची बायको ही त्याला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती असते. आता याच प्रिय व्यक्तीचं म्हणजेचं बायकोचं मनं जिंकण्यासाठी कलर्स मराठी त्यांच्या “नवऱ्यासाठी” एक अनोखं आव्हान घेऊन आले. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करत आहेत. नुकताच सुरु झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदाशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. प्रेक्षकांनी दिलेल्या पसंती आणि प्रेमानेमुळेच “नवरा असावा तर असा” या कार्यक्रमाने नुकतेच ५० भाग पूर्ण केले आहेत.  या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना महाराष्ट्रासमोर त्यांच्या बायकोला आवडणारी एखादी खास गोष्ट करण्याची संधी मिळाली जे पाहून त्यांच्या गृहलक्ष्मी नक्कीच त्यांच्यावर खुश तर नक्कीच होत असतील. कार्यक्रमामध्ये बायको नवऱ्यासाठी आव्हान ठरवते आणि नवरा हे आव्हान पूर्ण करतो आणि जो पूर्ण करतो तोच त्या भागाचा विजेता ठरतो. यामध्ये गंमत अशी आहे कि, जिंकतो नवरा आणि बक्षीस मिळते बायकोला. या आगळ्यावेगळ्याने संकल्पनेमुळे हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहे. ईतकेच नव्हे तर हर्षदाताई यांची वेशभूषा, त्यांच्या साड्या, त्यांची “नवरा असावा तर असा” हे बोलण्याची पद्धत देखील प्रेक्षकांना आवडत आहे.काही दिवसांपूर्वी  या शोमध्ये महाराष्ट्राच्या दोन लाडक्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. विशाखा सुभेदार आणि नम्रता आवटे या त्या अभिनेत्री असून त्यांनी आपल्या पतीसोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावून भरपूर गप्पा मारल्या आणि धम्माल मस्ती देखील केली. विशाखा सुभेदार आणि त्यांच्या पतींनी त्या दोघांची भेट कशी झाली, ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, त्यांचे लग्न कसे झाले हे सांगितले.तसेच नम्रता आवटे आणि तिच्या नवऱ्याने देखील त्यांच्या नात्यातील काही महत्वाच्या गोष्टी कार्यक्रमामध्ये सांगितल्या.