Join us

स्टँड अप कॉमेडियन नवीन प्रभाकर तब्बल पंधरा वर्षांनी रंगभूमीवर, म्हणाला- पहिल्यांदाच असा.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:21 IST

'पैचान कौन' या पंचलाईनचा घराघरात पोहोचलेले कॉमेडियन नवीन प्रभाकर त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन सरप्राईज पॅकेज घेऊन आला आहे.

'पैचान कौन' या पंचलाईनचा घराघरात पोहोचलेले कॉमेडियन नवीन प्रभाकर त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन सरप्राईज पॅकेज घेऊन आला आहे. ते सरप्राईज पॅकेज आहे, 'कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर' हा नवा कोरा लाईव्ह शो. या कार्यक्रमाचा आठवा प्रयोग बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पार पडला. "कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर' कॉमेडी शो च्या निमित्ताने नवीन प्रभाकर १५ वर्षांनी आपल्या खुमासदार शैलीमधे स्टँडअप कॉमेडीचे सादरीकरण करत आहे.

९०० पेक्षा जास्त  प्रेक्षकांची उपस्थिती असलेल्या त्या लाइव्ह शोने नाट्यगृह हास्याच्या गडगडाटाने आणि टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून गेले. या लाईव्ह शोमध्ये नवीन प्रभाकर'सोबत नितीन भांडारकर आणि राजकुमार जावकर म्हणजेच राजकुमार रँचो याही स्टॅंडअप कॉमेडीयन्सनी प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करीत रंगत वाढविली. या शोची मूळ संकल्पना नवीन प्रभाकरची असून, 

कार्यक्रमाच्या स्वरुपाविषयी नवीन प्रभाकर सांगतो, "या कार्यक्रमाचे माध्यम हे पूर्णपणे हिंदी आहे.  पण कार्यक्रमाला ज्या भाषिक माध्यमाचा प्रेक्षक लाभेल त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाचे सादरीकरण करतो. मराठी प्रेक्षक असेल तर अर्ध्या तासाचे मराठीतून सादरीकरण करतो. गुजराथी असेल तर आम्ही गुजरातीतूनच सादरीकरण करतो. या कार्यक्रमात व्यंगात्मक टिप्पणीही आहे. बॉलिवूड मिमिक्री, डान्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  चालू घडामोडींवर विनोदी पद्धतीने भाष्यही केलेले आहे.."

“गेल्या दोन दशकांपासून, आम्ही OTT शो व्यतिरिक्त टेलिव्हिजन वरून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहोत. पहिल्यांदा असा कार्यक्रम थिएटर मध्ये करीत आहोत. आमच्या स्टँड-अप कॉमेडी शोद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहोत. मला स्वतःला सुध्दा माझ्या प्रिय प्रेक्षक, कुटुंब, मित्रांसोबत बसून हसायला आवडते. प्रत्येक शो ला, ८०० ते ९०० प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत शोची  मजा लुटली. " अशी माहिती नवीन प्रभाकरने दिली.

टॅग्स :सेलिब्रिटी