मराठीच्या छोट्या पडद्यावरील काही कलाकारांची मुलांनी आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. असेच काही स्टार किड्स सध्या मराठी मालिकाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकतायेत. सध्या मराठी छोट्या पडद्यावर हे स्टार किड्स महत्त्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळत आहेत.
सोहम बांदेकर
अभिनेता सोहम बांदेकर स्टार प्रवाह वाहिनीवर नवे लक्ष्य या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. पण तुम्हाला माहितीये का सोहम हा कोणाचा मुलगा आहे ते.... सोहम मराठीतील लाडकं कपल अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे. एका मुलाखतीत सोहमने त्याला ही मालिका कशी मिळाली बाबत खुलासा केला होता, “माझ्यापेक्षाही माझे कुटुंबीय आणि लोकांनाच मी मनोरंजन क्षेत्रात यावे असे वाटत होते. मी पडद्यामागच्या तांत्रिक गोष्टींपासून सुरुवात केली. लॉकडाउनमध्ये मी रोज एक चित्रपट बघत होतो. त्यानंतर मला अभिनयाकडे वळावंसे वाटलं. वेगवेगळ्या ऑडिशन देऊ लागलो आणि 'नवे लक्ष्य'साठी निवड झाली.”
शर्वरी कुलकर्णी
अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी ही आपल्याला झी मराठी वाहिनीवरील मन उडु उडु झालं या मालिकेमध्ये शलाकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. शर्वरी ही अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची लेक आहे. शर्वरीने इंटिरिअर डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय तिने नाट्यशास्त्राची पदवी देखील घेतली आहे.
जुई भागवत
तुमची मुलगी काय करते या मालिकेत अभिनेत्री जुई भागवत सावनी मिरजकर ही भूमिका साकारताना दिसतेय. जुई ही अभिनेत्री दिप्ती भागवत हिची मुलगी आहे. आईबरोबर अनेकदा ती सेटवर आली आहे. आईला बघत बघतच जुईमध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. याआधी जुईने 'राजा शिवछत्रपती', 'कुलवधू' मालिकांमधून बालकलाकाराची भूमिका, 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' कार्यक्रमातील ग्रूमिंग, विविध एकांकिका, इव्हेंट्स, फेस्टिव्हल्स यामध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. आता मात्र तुमची मुलगी काय करते या मालिकेत सावनीची भूमिका साकारत वेगवेगळ्या छटा रंगवताना पाहायला मिळतेय.
रूमाणी खरे
तू तेव्हा तशी मालिका झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झाली. या मालिकेतून एक नवा चेहरा ही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तिचे नाव आहे रूमानी खरे. पण रूमानी कोण आहे हे तुम्हाला माहितीये का... ती प्रसिद्ध कवी-गायक म्हणजे संदीप खरे यांची लेक आहे. तसं पाहालयला गेलं तर रूमानीने बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. श्रीरंग गोडबोल दिग्दर्शित चिंटू आणि २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चिंटू २ या सिनेमांमध्ये रूमानीने बालकलाकार म्हणून काम केले आहे. याशिवाय २०१९ साली तिने आई पण बाबा पण या नाटकांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. रूमानीला अभिनयासोबत तिला डान्सचीही आवड आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिचे अनेक फोटो आणि व्हि़डीओ शेअर करत असते.