यंदाचा ‘स्टार परिवार अवॉर्डस’मध्ये सा-यांचे आकर्षण ठरले ते म्हणजे कसौटी जिंदकी के 2 मालिकेतचे अनुराग आणि प्रेरणा. या दोघांच्या येण्याने हा सोहळा थोडा हटके आणि खास ठरला. नेहमीप्रमाणेच आगळ्यावेगळ्या ठरणा-या या पुरस्कार सोहळ्याची सा-यांनाच उत्सुकता लागली होती. ग्लॅमसर अभिनेत्रींच्या स्टायलिश लूकने या सोहळ्याला चारचाँद लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र याच भाव खावून गेले ते प्रेरणार साकारणारी एरिका फर्नांडिस आणि अनुराग साकाराणार पार्थ समथान. यावेळी अगदी स्टायलिश अंदाजात रेड कार्पेटवर ते अवतरताच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
अनुराग आणि प्रेरणाचा हा पहिलाच स्टार परिवार पुरस्कार सोहळा असला, तरी या जोडीने तत्पूर्वीच आपला ठसा उमटवला आहे. अनुरागची भूमिका साकारणा-या पार्थ समथानने ‘स्टार परिवार पुरस्कार सोहळा 2018’मध्ये सहभागी होण्याबद्दलची आपली उत्सुकता व्यक्त करताना सांगितले की, “या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्याची आमची ही पहिलीच वेळ असली, तरी त्याचे शानदार आयोजन आणि भव्य स्वरूप पाहून आम्ही पूर्णपणे भारावून गेलो आहोत. अशा या अफलातून परिवाराचा सदस्य होताना आमच्या मनात एक अतिशय आनंद आणि उत्साहाची भावना आहे. या सोहळ्यात आम्ही प्रथमच व्यासपिठावर एक कार्यक्रम सादर केला आणि तो अनुभवही खूप चांगला होता. स्टार परिवाराशी असलेला आमचा संबंध अनंत काळ कायम राहील, अशी अपेक्षा असून आम्हाला आता आगामी काळात होणा-या पुरस्कार सोहळ्याचे वेधही लागले आहेत.”
या पुरस्कार सोहळ्यात दोघांनी दोन गाण्यांवर एक रोमँटीक परफॉर्मन्सही दिला. ‘स्टार परिवार पुरस्कार सोहळ्या’त अनेक कलाकारांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्य आणि नाट्यामुळे ही रजनी अतिशय रंजक आणि स्मरणीय ठरली. लवकरच हा सोहळा छोट्या पडद्यार रसिकांना अनुभवत येणार आहे.
नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे. पूर्वीच्या सिझनप्रमाणेच 'कसौटी जिंदगी की' 2 लाही रसिकांची पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच ही मालिका रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.