Join us

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून तिसरी एक्झिट? 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, प्रेक्षक नाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:13 IST

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कायम नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात.

Laxmichya Pavlani: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कायम नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. या दैनंदिन मालिका आणि प्रेक्षकांमध्ये एक वेगळं नातं निर्माण झालेलं असतं. त्यामुळे मालिकांमध्ये थोडा जरी बदल झाला तरी त्यावर मोठा परिणाम होता. मालिकेतील बदलाचा वेगळाच परिणाम पाहायला मिळतो. असाच बदल स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेमध्ये पाहायला मिळतोय. ही मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी मालिका आहे. अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा आघाडीवर असते. परंतु, नुकतीच या लोकप्रिय मालिकेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. 

'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.  मालिकेतील अद्वैत-कलाच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. अशातच या मालिकेतील आगामी प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा पाहायला मिळतोय. या व्हायरल प्रोमोमध्ये कलाची सासूबाई म्हणजेच सरोज चांदेकर भूमिका साकारणाऱ्या  ही मालिका सोडली आहे.  त्यांच्या भूमिकेत एका नवा चेहरा दिसत आहे. मालिकेत आता सरोजची भूमिका अभिनेत्री पल्लवी पटवर्धन साकारणार आहेत.  त्यामुळे या मालिकेची सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. याशिवाय मालिका रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. 

अगदी काही महिन्यांपूर्वीच लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत राहुल नावाचं खलनायिकी पात्र साकारणाऱ्या ध्रुव दातारने मालिकेत अचानक एक्झिट घेतली. त्यानंतर राहुलची ऑनस्क्रीन पत्नी म्हणजेच नैनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा सपकाळनेही सुद्धा मालिका सोडली. आता चांदेकरांची मोठी सून म्हणजेच अद्वैतची आई सरोजने मालिकेला रामराम केल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी