गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचंच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. सगळ्यांच्या लाडक्या बाप्पांचं आगमन होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज आहे. "स्टार प्रवाहगणेशोत्सव २०२३ ।। आरती घराघरातली ।।", या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा महाराष्ट्रातील आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांचा गजर होणार आहे.
साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. 'अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ.
ओकारांमधील साडेतीन मात्राचेच प्रतिक या साडेतीन शक्तीपीठांमधून दिसते. या प्रमुख तीन पीठांचा ज्यात समावेश केला जातो, अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तींपीठांचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व, मान्यता, पौराणिक कथा कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३ हा कार्यक्रम पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल. स्टार प्रवाहच्या सगळ्या नायक आणि नायिकांचे सुंदर फोटो समोर आले असून फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. जयदीप,गौरी यांचा शिव पार्वती लुक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. रविवार २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.