Tharl Tar Mag: 'ठरलं तर मग' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर या पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान, या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहयला मिळत आहेत. सायलीने सुभेदाराचं घर सोडल्यापासून अर्जुनला क्षणभरही तिच्याशिवाय करमत नसल्याचं दिसतंय. सध्या मालिकेत सायली-अर्जुन एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत असल्याचा रोमॅंटिक ट्रॅक सुरु आहे. परंतु त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्याने त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सुभेदार कुटुंबीयांकडून अर्जुन-प्रियाच्या लग्नाचा घाट घालत असल्याचं दिसत आहे.
'ठरलं तर मग' मालिकेचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रोमो लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, सायलीला भेटण्यासाठी गेलेला असताना अर्जुनवर काही लोक हल्ला करतात. या हल्ल्यात त्याला दुखापत होते. त्यानंतर सायली अर्जुनला मलपट्टी करते. त्यानंतर अर्जुला त्याच्या मिसेस सायलीला म्हणतो, 'एक दिवस घरचे सगळे तुम्हाला परत घरी बोलावतील. सर्वांचं मन जिंकून तुम्ही पुन्हा घरी याल'. हे सगळं झाल्यावर अर्जुन घरी जातो. त्यानंतर अर्जुनचे वडील प्रताप अर्जुनला त्याच्याशी काही बोलायचं आहे असं सांगतात. यावर अर्जुन काय बोलायचं आहे? असं त्यांना विचारतो. त्यानंतर पूर्णा आजी अर्जुनला म्हणते, की 'गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात जे काही घडतंय ते आपण मागे टाकायलं हवं. यासाठी आम्ही सर्वांनी तुझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विचार केला आहे.' पूर्णा आजीचे ते शब्द ऐकून अर्जुन विचारात पडतो. या व्हायरल प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेमध्ये पुढे काय घडणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.