Join us

असा शूट झाला 'ठरलं तर मग' मधील सायली-अर्जुनचा रोमॅंटिक ट्रॅक; पाहा पडद्यामागील खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:29 IST

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

Tharla Tar Mag Serial:  स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिकेचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेच कथानक त्यातील पात्र प्रत्येकाने आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपलसं केलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. सायली-अर्जुनसह, कल्पना सुभेदार, पूर्णा आजी तसंच तन्वी किल्लेदार, अस्मिता आणि महिपत शिखरे यांची या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही मालिकेत सायली सुभेदारच्या भूमिकेत दिसतेय. तर अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार नावाची व्यक्तिरेखा साकरतो आहे.  दरम्यान, या मालिकेत लवकरच सायली-अर्जुनच्या रोमॅंटिक ट्रॅक दाखवण्यात येणार आहे. याचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा रोमॅंटिक ट्रॅक कसा शूट करण्यात आला याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर 'ठरलं तर मग' मालिकेतील  शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन-सायलीचा रोमँटिक सीन कसा शूट करण्यात आला हे दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसतंय की, सुरुवातीला सायली एसटी स्टॅंडच्या बाहेर हातात बॅग घेऊन उभी असलेली पाहायला मिळतेय. त्याचबरोबर सायलीसोबत बाजुलाच कुसुमताई देखील दिसते आहे. तर सायलीच्या पाठीमागे अर्जुन हातात अंगठी घेऊन तिला गुडघ्यांवर बसून प्रपोज करताना दिसतो आहे. अर्जुनचा मित्र चैतन्य सुद्धा तिथे आहे. 

पुढे व्हिडीओमध्ये, एसटीमधील सायली आणि कुसुमताई यांच्यामधील भावनिक क्षण दाखवण्यात आला आहे. यासोबतच एसटी स्टॅंडवर सायली तोंडाला मास्क लावून बसलेली असतानाचे काही पडद्यामागचे क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतायत. या रोमॅंटिक ट्रॅकसाठी 'ठरलं तर मग' मालिकेच्या प्रत्येक टीम मेंबरने घेतलेली मेहनत या व्हिडीओतून दिसते आहे. अगदी एसटीच्या टपावर उभे राहून केलेलं शूट असो किंवा कलाकारांची केमिस्ट्री हे सगळं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. "अर्जुन सायलीसमोर देणार त्याच्या प्रेमाची कबुली! तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतात तो क्षण असा झाला शूट. पाहा पडद्यामागचे काही क्षण..." असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. शिवाय अभिनेत्री जुई गडकरीला टॅग करत हा व्हिडीओ स्टार प्रवाह वाहिनीने पोस्ट केला आहे. 

टॅग्स :जुई गडकरीटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया