काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील कार्यक्रम हे टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये असायचे. माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, अग्गंबाई सासूबाई, माझा होशील का, चला हवा येऊ दे यांसारख्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. कलर्स मराठी अथवा स्टार प्रवाहवरील मालिका पहिल्या पाचमध्ये कधीच नसायच्या. पण आता सगळ्या मालिकांना मागे टाकत गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील मालिका अधिक फेमस झाल्या आहेत. कारण या आठवड्याच्या टिआरपीनुसार पहिल्या पाचमध्ये असलेल्या सगळ्याच मालिका या स्टार प्रवाह वाहिनीवरील आहेत. गेल्या आठवड्यात देखील स्टार प्रवाहच्याच मालिकांची चलती होती. बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडिया) च्या रिपोर्टनुसार, स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलगी झाली हो या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत एका महिलेने सगळ्यांचा विरोध पत्करून मुलीला जन्म दिला आहे इतकंच नाही तर एकटीने तिची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली आहे.
पहिल्या क्रमांकावर रंग माझा वेगळा ही मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. याच विषयावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर होती. पण या आठवड्यात याची जागा मुलगी झाली हो या मालिकेने घेतली आहे. तिसऱ्या क्रमांकावर रंग माझा वेगळा या कार्यक्रमाचा महाएपिसोड आहे.
चौथ्या क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आहे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलीचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.
पाचव्या क्रमांकावर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका आहे.