Join us

'तू भेटशी नव्याने' मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनारचा हटके लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 09:49 IST

Tu Bhetashi Navyane : ‘तू भेटशी नव्याने’ या टायटलप्रमाणेच एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे आणि शिवानी सोनार ही जोडी दिसणार आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता आपल्या भेटीला येणार आहे.

नव्वदीच्या दशकातील फॅशनचे बरेच ट्रेंड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेट केलेल्या ट्रेंडला या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. सोनी मराठी वाहिनीने या ट्रेंडचा अभ्यास करत त्याकाळातील फॅशन ट्रेंड  ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

सुबोध भावे(Subodh Bhave) ने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची? हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता ते पुन्हा नव्या लुकमुळे चर्चेत आहेत. ‘तू भेटशी नव्याने’ या टायटलप्रमाणेच एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे आणि शिवानी सोनार (Shivani Sonar) ही जोडी दिसणार आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. 

सुबोध आणि  शिवानी  यांच्या खास लूकची पहिली झलक समोर आल्यावर चाहत्यांना त्यांचा अनोखा अंदाज चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे. नव्वदीच्या दशकातील त्यांचा हटके लूक चर्चेचा विषय ठरलाय. ‘तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने प्रथमच दोन वेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीचा काळ अनुभवायला मजा येणार असल्याचे हे दोघे सांगतात. या मालिकेत पहिल्यांदाच AI चा वापर केला आहे. AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेच्या प्रोमो नंतर या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. 

टॅग्स :सुबोध भावे