सुबोध भावेचा अशोक मामांना मानाचा मुजरा, म्हणाला, 'मराठी इंडस्ट्री म्हणजे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:02 PM2023-03-23T14:02:00+5:302023-03-23T14:03:15+5:30

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे लाडके अभिनेते ज्यांना सर्वच प्रेमाने मामा अशी हाक मारतात ते अशोक सराफ.

Subodh Bhave gives tribute to senior actor Ashok saraf at zee chitra gaurav show 2023 | सुबोध भावेचा अशोक मामांना मानाचा मुजरा, म्हणाला, 'मराठी इंडस्ट्री म्हणजे...'

सुबोध भावेचा अशोक मामांना मानाचा मुजरा, म्हणाला, 'मराठी इंडस्ट्री म्हणजे...'

googlenewsNext

Zee Chitra Gaurav Award 2023 : मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे लाडके अभिनेते ज्यांना सर्वच प्रेमाने मामा अशी हाक मारतात ते अशोक सराफ (Ashok Saraf). अशोक मामांना यंदा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सर्वांचं प्रेम बघून अशोक मामा साहजिकच भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. याप्रसंगी अनेक कलाकारांनी त्यांच्या मनातील अशोक सराफांच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) व्यासपीठावर अशोक मामांना मानाचा मुजरा केला.

झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा २०२३ निमित्ताने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी एकत्र आली होती. यंदा अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवने अशोक मामांच्या लोकप्रिय गाण्यांवर परफॉर्म करत त्यांना ट्रिब्युट दिले. तसंच त्यांच्यासमोर साष्टांग दंडवत घालत नमस्कारही केला. याशिवाय अभिनेता सुबोध जाधव याने अशोक मामांचं मराठी इंडस्ट्रीत किती मोठं योगदान आहे हे सांगितलं. सुबोध म्हणाला, 'एका माणसामुळे संपूर्ण इंडस्ट्री ओळखली जाते. मराठी सिनेमा म्हणजे अशोक सराफ ज्यात काम करतो ती इंडस्ट्री. त्या माणसाबरोबर काम करण्याचं स्वप्न बघणं तर खूप लांबची गोष्ट त्यांना एकदा जवळून बघावं एवढीच इच्छा होती. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे तसं आज संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, झी मराठीच्या वतीने मामांचा गौरव सोहळा आमच्या सगळ्या त्यांच्या अभिनयावरती पोसल्या गेलेल्या पिढीसमोर होतोय. आताच्या प्रत्येक गोष्ट ओरबाडून काढण्याच्या काळात तुझ्यासारखा एक कलाकाराच्या संस्कृतीला घट्ट धरुन राहणाऱ्या, तुझ्या मायेची उब आमच्यावर असणाऱ्या तुला सर्व रसिक प्रेक्षकांकडून मानाचा मुजरा.'

सुबोध भावेच्या या मनोगतानंतर अशोक मामाही भावूक झाले. यावेळी व्यासपीठावर अभिनेता अंकुश चौधरी, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, भरत दाधव, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, रितेश देशमुख हे देखील उपस्थित होते. प्रेक्षकांना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा येत्या रविवार २६ मार्चला संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. खास बात म्हणजे या सोहळ्यात मराठीतली सदाबहार आवडती जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार सादरीकरण करणार आहेत.

Web Title: Subodh Bhave gives tribute to senior actor Ashok saraf at zee chitra gaurav show 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.