Join us

"मी राहुल गांधींचा बायोपिक केला तर तुम्हाला बघण्याचा अट्टाहास नाही", सुबोध भावे असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:31 AM

"मी राहुल गांधींची भूमिका केली तर...", सुबोध भावेचं स्पष्ट मत, म्हणाला, "जेव्हा माझ्याकडे बायोपिक येतो..."

छोट्या पडद्यावरील 'खुपते तिथे गुप्ते' या लोकप्रिय शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. आता अभिनेता सुबोध भावे अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये उत्तरं देणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'च्या आगामी भागात सुबोध भावे हजेरी लावणार आहे. या भागाचे काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. या शोमध्ये सुबोधने काँग्रेसचे राहुल गांधी यांची भूमिका साकारण्यावरुन केलेलं विधान चर्चेत आहे. 

अवधूत गुप्तेने या कार्यक्रमात सुबोधला "तू मुलाखतीत म्हणाला तसं तुला राहुल गांधींची भूमिका असलेला सिनेमा करण्याची इच्छा आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुबोध उत्तर देत म्हणाला, "मी त्यांची कशाप्रकारे मुलाखत घेऊ शकतो, याचा विचार करत होतो. आपण इतके बायोपिक केले आहेत. माझ्याकडे तुमचा बायोपिक आला आहे, याच कल्पनेने आपण मुलाखतीची सुरुवात केली तर, असा विचार माझ्या डोक्यात आला. जेव्हा माझ्याकडे बायोपिक येतो, तेव्हा मी त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. यासाठी राहुल गांधी म्हणजे नेमके तुम्ही कसे आहात? याचा मला अभ्यास करायचा आहे, अशी कल्पना होती. एखाद्या व्यक्तिरेखेला जेव्हा मुलाखतीतून जाणून घेण्याची गरज असते, तेव्हा त्याच अनुषंगाने प्रश्न आणि उत्तरही येतात."

“पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...”

"मी कुठल्या भूमिका करायच्या आहेत, याचं मला स्वातंत्र्य आहे. तुम्ही ते बघायचं की नाही, याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. मी राहुल गांधींची भूमिका केली तर ती तुम्हाला बघायला यायलाच पाहिजे, असा माझा अट्टाहास नाही. मी कोणाला सक्तीही केलेली नाही," असं म्हणत सुबोधने अगदी परखडपणे त्याचं मत मांडलं. 

‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

सुबोध भावेने 'डॉ. काशिनाथ घाणेकर', 'बालगंधर्व', 'लोकमान्य : एक युगपुरुष', 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटांत काम केलं आहे. 'हर हर महादेव' या ऐतिहासिक चित्रपटात सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसला होता.  

टॅग्स :सुबोध भावे राहुल गांधीमराठी अभिनेता