Join us  

सुबोध भावेच्या 'तू भेटशी नव्याने' मालिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 7:47 PM

Tu Bhetashi Navyane Serial: माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत दाखवण्यात आली आहे.

मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत 'तू भेटशी नव्याने' (Tu Bhetashi Navyane Serial) मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठीने पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) यांची फ्रेश जोडी आणि प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली हे.‘उत्तम कथा’, ‘माही आणि अभिमन्यू  यांचा संवाद लाजवाब’,‘आम्हांला खूप आवडते ही मालिका’,  ‘उत्तम अभिनयाने नटलेली ही मालिका पाहण्याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय’. ‘एआयचा उत्तम वापर असलेली सर्वोत्कृष्ट मालिका’ अशा अनेक चांगल्या प्रतिकिया प्रेक्षकांकडून येतायेत.   

अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालाय, याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी सांगितलं, 'मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून चांगलं काम करायला अजून उत्साह  मिळतो. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचीच खूप छान भट्टी जमून आली आहे. 'तू भेटशी नव्याने' या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रिया मराठे आणि किशोरी आंबिये यांच्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये भरपूर नाट्य घडणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे यात शंका नाही.

आयुष्यात पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलीत दिसत आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते  संदीप जाधव आहेत. 

टॅग्स :सुबोध भावे