आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. प्रेक्षक या मालिकेबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती सर्वांना आपलीशी वाटते. ती प्रत्येकाच्या घरातील जणू सदस्य बनली आहे. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. अरुंधती उर्फ मधुराणीची इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट नुकतीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने अरुंधतीच्या गेटअपमधील फोटो शेअर करत लिहिले की, मावळत्या दिनकरा...अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा....या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तसेच या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
अनिरुद्धचा संताप अनावरआई कुठे काय करते मालिकेत नुकतेच अरुंधतीने तिचे पहिले गाणे रेकॉर्ड केले आहे. त्यामुळे घरातील सगळे खूप खूश आहेत. दरम्यान अलिबागवरून रेकॉर्डिंग करून घरी परतत असताना रस्त्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांना एक रात्र बाहेरच थांबावे लागणार आहे. आधीच इतक्या लांब आशुतोषसोबत अरुंधती गेली म्हणून अनिरुद्ध चिडला होता आणि आता एक रात्र बाहेर राहणार म्हटल्या अनिरुद्ध याचा वेगळा अर्थ काढून पुन्हा नवीन वाद उकरताना दिसेल का, हे आगामी भागात कळेल.