कलाकारांचे वाढदिवस ब-याचदा त्यांच्या मित्र मंडळींबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये सेलिब्रेट करताना आपण पाहतो.मात्र काही कलाकार त्यांच्या या खास दिवसाचे सेलिब्रेशन मात्र अगदी हटके पद्धतीने सेलिब्रेट करतात. तसाच काहीसे जुई गडकरीनेही तिच्या बर्थ डे सेलिब्रेशन केले. कोणत्याच प्रकारचा गाजावाज न करता अगदी खास आणि थोडं हटके पद्धतीने तिने तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे.
प्राण्यांबद्दल प्रेम आणि दया सर्वांनाच असते, पण त्यांच्यासाठी काम करणारे फारच कमी असतात. पण आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरीने प्राण्यांवरचे प्रेम हे काही लपलेले नाही.म्हणूनच जुईने ह्या वर्षी तिचा वाढदिवस अनोखा पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. जुईने प्राण्यांना वेळ देऊन, त्यांच्यासोबत खेळून आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिने एका प्राण्यांसाठी काम करणा-या संस्थेला भेट देत तेथील प्राण्यांसह वेळ घालवला.तसेच त्यांना खाद्यपदार्थ देखील दिले. तेथील डॉक्टरांची भेट घेऊन प्राण्यांसंदर्भात माहिती मिळवली.चांगले कार्य करुन मनाला समाधान मिळवणारे असे अनेक उपक्रम जुई करत असते, पण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला वेळ अशा उपक्रमासाठी देणं हे खरंच कौतुकास्पद आहे. तसेच तिने स्वतः सोबत तिच्या कुटुंबाला ही ह्या उपक्रमात सामील केले होते. प्राण्यांबद्दलचा असा जिव्हाळा,आपुलकी आणि आदर दाखवणे यामुळे जुईच्या सोज्वळ स्वभावाचा अंदाज येतो.
8 जुलै 1988 रोजी मुंबई जवळील कर्जत येथे जुईचा जन्म झाला. जुईचे वडील केतन गडकरी लेखक, गीतकार असून एमटीएनएलमध्ये कामाला आहेत. तर आई नेत्रा गडकरीसुद्धा एमटीएनएलमध्ये नोकरी करते. राम गणेश गडकरी हे जुईचे पंजोबा आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत जुई लहानाची मोठी झाली. तिने मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेद्वारे 'कल्याणी'च्या भूमिकेतून ओळख मिळवलेली अभिनेत्री जुई गडकरी बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती.