असा गेला बिग बॉस मराठीचा पहिला दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 8:06 AM
बिग बॉसच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. हिंदी बिग बॉससारखीच मराठीच्या या पर्वाच्या दिवसाची सुरुवातदेखील गाण्याने झाली. बिग ...
बिग बॉसच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. हिंदी बिग बॉससारखीच मराठीच्या या पर्वाच्या दिवसाची सुरुवातदेखील गाण्याने झाली. बिग बॉसच्या नियमानुसार पहिल्याच दिवशी सगळं सामान घरातील सदस्यांना देता येत नाही. पहिला दिवस असल्यामुळे सगळेच आपल्या सामनाशिवाय राहात होते. चहा–पाण्याची आणि सकाळच्या नाशत्याची सोय बिग बॉसने करून ठेवली होती. गाणं वाजण्याअगोदर घरामधील बरेचसे सदस्य उठले होते. काही गप्पा मारत होते, तर काही सकाळचा व्यायाम करत होते. जुई गडकरीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. दिवस उशिरा सुरू झाल्याने दुपारचे जेवण देखील उशिराच झाले. इतर सदस्यांशी गप्पा मारताना मेघा धाडेने तिला स्वयंपाक करायला आणि किचनचे सामान लावायला खूप आवडते असे सांगितले. जुईला जेवण तर येते, पण तिच्या एका वाक्यावर सगळ्यांच हसू आले. कारण ती म्हणाली, “मला फक्त एका वेळी एकाच व्यक्तीसाठी चहा बनवता येतो. त्यामुळे १५ जणांसाठी मला चहा १५ वेळा बनवायला लागणार”.पहिला दिवस असल्याने, बिग बॉसने नियम पत्र पाठवले होते, जे मेघा धाडेने घरच्या सदस्यांना वाचून दाखवले. तसेच काही वेळातच किचनचे सामान देखील घरच्यांना मिळाले. गप्पांगप्पामध्ये आरतीने पुष्कर मला आवडायचा हे घरच्यांसमोर सांगताच सगळ्यांनी पुष्कर–आरतीला चिडवायला सुरुवात केली.घरामध्ये येताच मनोरंजनाचा तडका Glam गर्लनी देण्यास सुरुवात केली आहे... मेघा, सई, रेशम, जुई तसेच सीमा यामध्ये कोण जास्त Glamorous दिसणार यामध्ये चढाओढ सुरू झाली आहे. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना रेशम, उषा नाडकर्णी अणि आरती सोलंकी यांनी घरातील इतर मुलींना वेगळी वेगळी नावं ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे जसजसे दिवस पुढे जाणार तसतशी ही स्पर्धा आणि हा खेळ अजूनच रंगत जाणार यात शंका नाही.स्पर्धक वाट बघत असलेली गोष्ट शेवटी बिग बॉसने सांगितली. बिग बॉस मराठी मधील पहिली परीक्षा आणि घरातील सदस्यांमधील अपात्र नावं सर्वानुमताने घोषित करण्याचा संदेशने बिग बॉसने दिला... आता कोण कोणाचं नावं घेणार? परीक्षा काय असणार? कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे. Also Read : हे आहेत बिग बॉस मराठीचे स्पर्धक...