नुकतेच कॉमेडियन सुगंधा मिश्राने डॉ. आणि कॉमेडियन असलेल्या संकेत भोसलेसोबत लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे. 26 एप्रिल रोजी फगवाडा (पंजाब) येथील क्लब कबाना रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी पोहोचलेल्या सर्व पाहुण्यांना 24 तासांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. इतकेच काय तर या लग्नात उपस्थित राहणारे पाहुण्यांना लग्नस्थळी जाण्यापूर्वी अँटीजन टेस्ट करावी लागली होती. अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सुगंधा आणि संकेतचा विवाहसोहळा पार पडल्याचे बोलले गेले.
लग्नानंतर आता हे कपल मोठ्या अडचणीत सापडले आहेत. लग्नादरम्यान कोरोना लॉकडाऊनचे नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सुगंधा मिश्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत सगळ्या गोष्टी सुगंधा सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करताना दिसली. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहत्यांनीही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती दिली शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे सुगंधाला चांगलेच महागात पडले आहे.
सुगंधा आणि संकेतच्या लग्नात नियमापेक्षा अधिक लोक जमले असल्याचा तिच्यावर आरोप आहे. कोरोना लॉकडाऊनच्या नियमांनुसार लग्नसमारंभासाठे केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडणार त्यातही दोन तासात लग्न उरकावे लागणार असा नियम होता. मात्र या लग्नात १०० लोकांची उपस्थिती असल्याचे आरोपर तिच्यावर लावण्यात आला आहे. सुगंधाच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे. सुगंधासोबत ज्या हॉटेमध्ये हे लग्न पार पडले त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनही या लग्नामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहे.
लग्नापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सुगंधाने सांगितले होते की, लग्नाची शॉपिंग देखील ऑनलाईन करणेच तिने पसंत केले होते. डिसेंबर पासून लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती. इतकेच नाही तर सुगंधाच्या आई सविता मिश्रा यांनी सांगितले होते की, ठरल्याप्रमाणे हे लग्न डिसेंबरमध्येच होणार होते. पण वारंवार कोरोना लॉकडाऊनचे नियम बदलत होते.
त्याप्रमाणे लग्नाची तारिखही पुढे ढकलावी लागत होते. मोठ्या थाटात हे लग्न पार पडावे असे कुटुंबाची इच्छा होती. परंतु कोरोनामुळे कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आता लग्नसोहळा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.