Join us

'घरकाम करणाऱ्यांनाही महिन्याला पगार देतो. पण..'; सुकन्या मोनेंनी मांडली टीव्ही कलाकारांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 4:46 PM

Sukanya kulkarni: सुकन्या कुलकर्णी यांनी मालिकेत काम करताना कोणत्या आणि कशाप्रकारच्या अडचणी येतात हे सांगितलं आहे.

कधी सुधा होऊन तर कधी माई होऊन प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सुकन्या कुलकर्णी-मोने (sukanya kulkarni-mone). 'आभाळमाया', 'जुळून येती रेशीमगाठी', 'वादळवाट', 'कळत नकळत', 'प्रेमासाठी वाट्टेल ते', 'एकापेक्षा एक' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये काम करुन सुकन्या यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. अलिकडेच त्यांचा बाईपण भारी देवा हा सुपरहिट सिनेमा सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे त्या चर्चेत येत आहेत. यात अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मालिकांसाठी कलाकारांना मिळणार मानधन आणि चॅनेलचा वाढत चाललेला हस्तक्षेप यांवर भाष्य केलं आहे.

सुकन्या कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच 'अमृता फिल्म' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी टीआरपीसाठी लागलेली घोडदौड, चॅनेलचा हस्तक्षेप, कलाकारांचं मानधन या सगळ्याविषयी त्यांची खदखद व्यक्त केली आहे.

लेकीसाठी सुकन्या कुलकर्णी पणाला लावणार होत्या करिअर; इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय

चॅनेलचा हस्तक्षेप खूप वाढला आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर हो. खूप करतं. TRP च्या गणितामुळे हे सगळं बिघडलं आहे. टीआरपीच्या गणितामुळे त्या कलाकृतीचा दर्जा कमी होताना दिसत आहे. पूर्वी आम्ही एकाच वेळी दोन-दोन मालिकांमध्ये काम करायचो. वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी करायचो. आता मात्र, तस होत नाही. आता एका वेळी एकाच मालिकेत किंवा एकाच चॅनेलवर काम करावं लागतं. आता तर एकाच चॅनेलच्या दोन मालिकांमध्येही काम करायची मुभा नसते. मुळात लेखक, दिग्दर्शकांवर विश्वास ठेवला तर ते चांगलं काम देऊ शकतील असं मला वाटतं, असं सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या.

लेकीला कायम पाठिंबा देणाऱ्या सुकन्या मोनेंच्या आईला पाहिलंय का? पहिल्यांदाच आल्या कॅमेरासमोर

पुढे त्या म्हणतात, "चॅनेलचाही काही तरी नाइलाज असेल पण चर्चा करुन हा प्रश्न सोडवला तर नक्कीच तो सुटेल.  ९ ते १० ही शिफ्ट कुठून आली हे मलाच कळत नाही. आधी एपिसोडनुसार मी काम करायचे त्यावेळी ९ ते ६ अशी वेळ असायची. तेव्हा तीन दिवसात एक एपिसोड व्हायचा. मी एकाच वेळी ४-४ एपिसोडमध्ये काम करायचे. पण, कधीच १० च्या पुढे काम केलं नाही. पण, आता एक एपिसोड पूर्ण करायला कलाकार ९० तास काम करतात."

दरम्यान, "३ महिन्यांनी मालिकांचा पगार मिळतो हे कुठून सुरु झालं काय माहिती. घऱी काम करण्याला बाईलाही आपण महिन्याच्या महिन्याला पगार देतो. आणि, आम्हाला तीन महिन्यांनी. हे कुठून आलंय काही समजत नाही", असं सांगत सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी मालिकांमध्ये काम करण्याचं स्वरुप कसं दिवसेंदिवस बदलत चाललं आहे हे सांगितलं.

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमाटिव्ही कलाकार