Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं' उत्कंठावर्धक वळणावर, गौरी कोर्टात देणार जयदीप विरोधात साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:43 PM

लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. गौरी जयदीप विरोधात कोर्टात साक्ष देणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे शालिनीचे डावपेच सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. जयदीप आणि मानसीचं लग्न थांबवण्यासाठी माई खऱ्या गौरीला समोर यायला सांगतात. यानंतर आता मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. गौरी जयदीप विरोधात कोर्टात साक्ष देणार आहे.

सोशल मीडियावर नुकताच सुख म्हणजे काय असतं मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. यात गौरी जयदीप विरोधात कोर्टात साक्ष देताना दिसतेय. आपल्याला जयदीपने दरीत ढकलल्याचं सगळ्यांसमोर सांगताना दिसतेय.

वकील गौरीला तुझ्या अपघात झाला की तू दरीत पाय घरसरून पडलीस असा प्रश्न विचारतात. यावर गौरी म्हणते मी दरीत पाय घसरून पडले. वकील तुला पुन्हा उलटा प्रश्न विचारतात तू दरीत पाय घसरून पडलीस की तुला कोणी ढकललं. यावर गौरी म्हणते होय मला दरीत ढकललं आणि मला ढकलणार माझा जयदीपच होता. खरतंर गौरीला दरीत ढकलणारा जयदीप नसतो मानसीचा भाऊ अनिल असतो. आता हे सत्य कोर्टा पुढे येणार का?, की यात खरा जयदीप अडकणार?, यावर जयदीपची प्रतिक्रिया काय असणार आहे?, या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील. 

टॅग्स :स्टार प्रवाह