स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील गौरी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरी उर्फ गिरिजा प्रभु ही घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर गिरीजाचा मोठा चाहता वर्ग आहे.
गिरीजा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. एरवी मालिकेत साधी सोज्वळ दिसणारी गौरी खऱ्या आयुष्यात फारच वेगळी. हे गिरीजाच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर नजर टाकल्यावर लक्षात येतं. गिरीज खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. आपले वेगवेगळ्या लूकमधलं फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
गिरीजा अभिनयाव्यतिरिक्त नृत्यातही पारंगत आहे. गिरीजाला आपण अनेक कार्यक्रमांमध्ये दर्जेदार डान्स करताना पाहिलं आहे. गिरीज अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. तिनं भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेआधी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून तिनं काम केलं आहे. कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे.