स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जयदीप अर्थात अभिनेता मंदार जाधव सध्या सगळ्यांचाच फेव्हरिट झाला आहे. स्मॉल स्क्रीनवरील त्याच्या भूमिकेचे सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर म्हणजेच त्याची पत्नीदेखील एक अभिनेत्री आहे.
मंदारच्या पत्नीच नाव मितिका शर्मा जाधव असे आहे. ती स्वत: देखील एक अभिनेत्री आहे.. देवो के देव महादेव या हिंदी मालिकेत मितिकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
मंदारने देखील हिंदी मालिकेत काम केले आहे. ही मालिका म्हणजे अलादीन. २०१६ साली मंदार आणि मितिकाने लग्न केले. त्यांना दोन मुले असून त्याचे नाव रिदान आणि रेहान असे आहे.मितीका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोज चांगलेच चर्चेत असतात.मंदार आणि मितीकाच्या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत सध्या दादासाहेब घर सोडून गेले आहेत. दादासाहेब गौरीला तिच्या वडिलांचा खून त्यांच्याच हातून चुकून होतो असे सांगतात. गौरीकडे कबुली दिल्यानंतर दादासाहेब घर सोडून जातात. गौरी माईला सगळं सांगते. पण माई दादासाहेबांवर गौरीने आरोप केला आणि त्यामुळे घर सोडून गेले असे म्हणतात. गौरीवर माई खूप नाराज होतात.