Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरी पहिल्याच दिवशी शालिनी आणि मानसीला शिकवणार धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:32 PM2022-03-07T12:32:36+5:302022-03-07T14:10:25+5:30

गौरी शालिनी, मानसी आणि जयदीपला धडा शिकवण्यासाठी स्मरणशक्ती गेल्याचा बनाव करुन घरात आली आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta: Gauri will be teach lesson to Shalini and Mansi on the first day | Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरी पहिल्याच दिवशी शालिनी आणि मानसीला शिकवणार धडा

Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरी पहिल्याच दिवशी शालिनी आणि मानसीला शिकवणार धडा

googlenewsNext

Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकेत नवनवे ट्वीस्ट आणले जातात. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतही असाच एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळतोय. माईंच्या साथीने गौरी शालिनी, मानसी आणि जयदीपला धडा शिकवण्यासाठी स्मरणशक्ती गेल्याचा बनाव करुन घरात आली आहे. आता ती शालिनी आणि मानसीला चांगलंच वठणीवर आणणार आहे. 

शालिनी गौरीला विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा हा डाव गौरी तिच्यावर उलटून लावताना दिसणार आहे. शालिनीने गौरीसाठी आणले विषारी दूध ती तिलाच पिण्यासाठी भाग पडणार आहे. यावेळी शालिनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र गौरी शालिनीला पकडून विषारी दूध जबरदस्तीने पाजताना आपल्याला दिसणार आहे. आता ती दूध शालिनी पिणार की गौरीच्या तावडीतून आपली सुटका करुन घेणार हे पाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी आई होऊ शकणार नाही, असा ट्रॅक मागच्या काही दिवसांत मालिकेत सुरू होता. यानंतर जयदीप व गौरी सरोगसीची मदत घेण्याचा निर्णय घेतात. मानसीही यासाठी पुढाकार घेते. मात्र यादरम्यान गौरीला मानसीचा खरा डाव कळतो. ती जयदीपला सर्व सांगण्याचा प्रयत्न करते. पण जयदीप ऐनवेळी तिला दगा देत, तिला कड्यावरून ढकलून देतो. आता गौरी नव्या अवतारात या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी शिर्के पाटील यांच्या घरात आली आहे,
 

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asta: Gauri will be teach lesson to Shalini and Mansi on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.