छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं. या मालिकेत अनेक चढउतार आले असून आता २५ वर्षानंतर पुन्हा एकदा जयदीप-गौरी एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे या मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यामध्येच आता मालिकेतील देवकीने काढता पाय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत अभिनेत्री भक्ती रत्नपारखी देवकी ही भूमिका साकारत होती. परंतु, नुकतीच तिने ही मालिका सोडली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने याविषयीची माहिती दिली. सोबतच आता तिने एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची हिंटही तिने दिली आहे.
काय आहे भक्तीची पोस्ट?
मॅडहेड' ..देवकी माझ्याबरोबर नेहमी राहील ....आज माझा 'सुख म्हणजे नक्की काय असतं....' मधला शेवटचा एपिसोड.. पण हे सुख माझ्याबरोबर नेहमी राहील.. मी कोणाचीतरी replacement केलेलं हे माझ पहिल character...ते ही इतक महत्त्वाचं आणि गाजलेलं ..ज्यात मी कधीच बोलले नाही ती भाषा मला बोलायची होती..खुप वेगळ्या shades होत्या़..पण ते करताना मला सगळ्यात मोठी मदत झाली ती अर्थातच आमचे Director ..one and only @chandrakantkanse sir ..त्यांनी सुरुवातीला आणि अगदी शेवटपर्यंत माझा confidence वाढवला..मला देवकी सापडायला मदत केली..त्यांची काम करायची जी पद्धत आह़े तीने actor म्हणून मला खुप छान घडवल आहे.खुप शिकवत आहे...आणि ही गोष्ट माझ्याबरोबर नेहमी राहील..चंदू sir thanku for everything..तूमच्या बरोबर काम करायची संधी मला नेहमी मिळूदेत ..You are great sir आमची पुर्ण director team , camera team, Makeup and Hair team, spot dada...सगळ्याना खुप खुप thanku.. Madhuri Mam, Amey..तुमच्याशिवाय हे शक्य नव्हत..kothare vision बरोबर काम करायची ही फ़क्त सुरुवात आह़े.. अजून खुप चांगल काम करायच आह़े आपल्यालामाझे सगळे co-actor.. तुमच्याशिवाय मी देवकी enjoy करू शकले नसते..thanku for everything...
सगळ्यांवर एक एक वेगळी post लिहायला पाहिजे एवढे सगळे Geat aahat आणि एवढे माझ्या जवळ चे झाला आहात Loave you all StarPravah channel वर काम करायला मिळाल यांसाठी मी खुप lucky आहे. thanku तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवतात त्याबद्दल ..अशीच संधी मला नेहेमी मिळेल याची खात्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सगळे माझे प्रेक्षक..मला देवकी म्हणून स्विकारल..माझ्यावर प्रेम केलत..माझा confidence वाढवला..कारण तुमच्याशिवाय मी हे करूच शकले नसते.. मी आले तेव्हा देवकी हे character सिरियलमध्ये खुप जुन होत..खुप हिट होत..त्याची replacement करणं माझ्यासाठी खुप मोठा task होता..माझी कोणाबरोबर compitition नव्हती ..ती असेल तर फक्त माझीच माझ्याबरोबर होती..मला ते character समजून घ्यायला तुम्ही वेळ दिला..त्यासाठी खुप खुप खुप धन्यवाद..असेच प्रेम राहूदेत..कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही कलाकार आहोत..तुमच मनोरंजन करायची संधी मला अशीच मिळत राहूदेत लवकरच भेटूयात एका नवीन भूमिकेत..