'महाभारत', 'तू तू मैं मैं', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' यांसारख्या मालिकांमध्ये सुमीत राघवनने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्याने एक कसदार अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमीतने मराठी, हिंदी चित्रपट, मालिका यांमध्ये आजवर दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटात तो ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेत आपल्याला दिसला होता. डॉ. श्रीराम लागू यांसारख्या दिग्गजाची भूमिका साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. पण सुमीतने त्याच्या अभिनयाने ही भूमिका खूप चांगल्याप्रकारे साकारली होती. सध्या त्याची वागळे की दुनिया ही मालिका आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
सुमीत राघवन हा दाक्षिणात्य असला तरी एखाद्या मराठी माणसापेक्षा देखील अस्स्खलित मराठी बोलतो. एवढेच नव्हे तर एका गोष्टीसाठी त्याचे आणि त्याची पत्नी चिन्मयी सुमीत यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आजकाल लोकांना आपल्या मुलांना इंग्रजी मीडियममध्ये शिकायला टाकणे हे स्टेटस सिम्बॉल वाटते आणि त्यामुळे पैसे नसले तरी लोक दुसऱ्यांकडे पैसे मागतात. पण आपल्या मुलांना इंग्रजी मीडियमच्या शाळेतच टाकतात. पण सुमीत आणि चिन्मयी यांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असून देखील त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी मीडियमच्या शाळेत न टाकता मराठी शिकवले आहे. यासाठी त्या दोघांचे नेहमीच कौतुक केले जाते.
सुमीत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी इंडस्ट्रीत काम करत आहे. त्याने साकारलेल्या दर्जेदार भूमिकांमुळे त्याचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. आपला आवडता अभिनेता खऱ्या आयुष्यात कसा आहे, त्याला कुठे फिरायला आवडते हे जाणून घ्यायची इच्छा चाहत्यांना प्रचंड असते आणि त्यामुळे ते त्यांना मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. सुमीतचे देखील फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असल्याने त्याला अनेक लाखांहून लोक इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर फॉलो करतात आणि तो देखील त्याच्या चाहत्यांसाठी त्याचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याच्या आगामी चित्रपट, नाटकांविषयी त्याच्या चाहत्यांना सांगत असतो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर आपल्याला त्याच्या पत्नीचे, दोन्ही मुलांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.