Join us

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीनं बॉडी शेमिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 12:37 IST

अक्षया नाईक हिने बॉडी शेमिंगबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक.  मराठीबरोबरच अक्षयाने हिंदी मालिकांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षयाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नुकतेच अक्षया नाईक हिने बॉडी शेमिंगबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

अक्षया हिनं नुकतेच 'अल्ट्रा मराठी बझ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. ती म्हणाली, 'माझ्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या मित्रमंडळींना मला पुढे जाऊन अभिनेत्री व्हायच आहे, हे माहिती नव्हतं. कारण, स्वत:बद्दल माझ्या मनात एवढा आत्मविश्वास नव्हता. माझं ठरलं होतं की कॉलेज झाल्यावर मी एक वर्षांचा गॅप घेणार आणि मी बारीक होणार. बारीक झाल्यानंतर ऑडिशन्सला जाणार, असा माझ्या लाइफचा प्लॅन होता. पण, मेरे रंग में रंगने वाली मालिका मिळाली'.

पुढे अक्षय म्हणाली, 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' मालिकेतील कलाकार खूप चांगले होते. शिरीन सेवानी हिनं मला सांगितलं होत की, अक्षया आम्ही जेव्हा ऑडिशनला जातो तेव्हा आमच्यासारख्या दिसणाऱ्या शंभर मुली रांगेत उभ्या असतात. पण, तुझं असं नाहीये. तू ऑडिशनला जाशील तेव्हा तुझ्यासारखं दिसणारं इतर कोणीच तिथे नसेल' तिच हे वाक्य माझ्या ऐकल्यावर माझं असं झालं ज्याला मी माझा कमीपणा समजतेय तीच माझी उजवी बाजू आहे'.

अक्षय म्हणाली, 'माझ्या घरी सुद्धा मी डाएट बोलले की, घरच्यांना तणाव येतो अरे बापरे आता ही जेवण सोडतेय की काय? आता माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे.  अर्थात या सगळ्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मला एक वेळ द्यावा लागला. कॉलेजमध्ये असताना मला कोणी रिजेक्ट करण्यापेक्षा मीच टॉमबॉय असल्याचे दाखवायचे. मला स्व:ताला स्वीकारायला भरपूर वेळ लागला. आयुष्यात मला जेवढ्या लोकांनी हिणवलं, तेवढ्याच लोकांनी मला साथही दिली. हे सोप नव्हतं. पण, आता या गोष्टीचा मला फरक पडत नाही'.

 

टॅग्स :अक्षया नाईकमराठी अभिनेतासेलिब्रिटी