कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये भरली असं म्हणायला हरकत नाही. यामधील सगळ्याच पात्रांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून या मालिकेतील कलाकारांमध्ये आता खूप चांगले नाते तयार झाले आहे. खूप वेळ एकत्र काम करत असल्याने सेटवर एकत्र राहून हे बॉंडिंग बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळतं. मालिकेच्या शूट दरम्यान सेटवरील काही कलाकारांमध्ये चांगली मैत्री होते, ते एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागतात. तसंच काहीसं इंदूच्या भूमिका साकारणार्या अतिशा नाईक आणि लतिका म्हणजेच अक्षया नाईक यांच्यामध्ये झालं. या दोघांचे ऑनस्क्रीन सासू – सून नातं असलं तरीदेखील त्यांच्यात कोणताही वाद नसल्याचे आपल्याला मालिकेत पाहायला मिळतं. ही मालिका पाहिल्यानंतर इंदूसाररखी सासू, आई मिळावी आणि लतिका सारखी समजूतदार मुलगी, सून मिळावी असं सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातं. अगदीच तसेच त्यांचे ऑफस्क्रीन नाते देखील खूप छान आहे.