कलर्स मराठी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharali) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिका जितकी लोकप्रिय झाली आणि सोबत मालिकेतील कलाकारही लोकप्रिय झालेत. या मालिकेतला दौलत (Daulat )आठवतं असेलच. नकारात्मक भूमिका साकारणा-या दौलतला तर या भूमिकेने नवी ओळख दिली. अभी आणि लतिका सोबतच दौलतही तितकाच प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या रांगडा अंदाज, त्याचा हटके लुक, त्याचे तेवढेच हटके संवाद सगळेच हिट झालेत. आज याच दौलतबद्दल आपण जाणून घेऊ यात.
अभिनेता हृषिकेश शेलारने (Hrishikesh shelar) दौलतची ही भूमिका साकारली आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ची भूमिका चालून आली आणि हृषिकेशने ही संधी लगेच कॅश केली. नकारात्मक भूमिका साकारण्याची त्याची भरून इच्छा होती आणि अशी भूमिका चालून आली म्हटल्यावर हृषिकेशने लगेच ती स्वीकारली.
हृषिकेश हा मूळचा सांगलीचा आहे. सांगलीतच त्याचा जन्म आणि शिक्षण झाले. मालिकेत ऋषिकेशची गर्लफ्रेंड ही कामिनी आहे. पण खºया जीवनात दौलतचे लग्न झालेले आहे. त्याच्या बायकोचे नाव स्नेहा अशोक मंगल असे आहे.
ऋषिकेशची बायको ही सुद्धा अभिनेत्री आहे तिने अनेक नाटकांमधे काम केले आहे . ‘लक्ष्मी सदैव मंगलंम’ या मालिकेतून ऋषिकेशने आपल्या करियरची सुरुवात केली होती. या मालिकेत त्याच्यासोबत समृध्दी केळकर दिसली होती. त्यानंतर त्याने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम केले आहे. त्याचबरोबर त्याने ‘शांतेचे कार्ट चालू आहे’ या नाटकांतही काम केले आहे.
काय आहे मालिकेचं कथानक?
सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना आहे. परंतु, आजच्या काळात सौंदर्याची व्याख्या जरा बदलेली दिसते. अशाच एका लठ्ठ पण, गोड मुलीची दमदार गोष्ट ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मांडण्यात येत आहे. मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक ‘लतिका’ची भूमिका आणि अभिनेता समीर परांजपे ‘अभिमन्यू’ची भूमिका साकारात आहेत. लतिका खेळकर स्वभावाची, शाळेपासून अभ्यासात प्रचंड हुशार, उत्तम स्वयंपाक करणारी मुलगी आहे. इतकं सगळं असून देखील केवळ शरीराने लठ्ठ असल्याने लहानपणापासून तिला टोमणे ऐकावे लागले आहेत. याच एकमेव कारणामुळे तिचे लग्नदेखील जमत नव्हते. 34 स्थळांकडून नकार आल्यावर मात्र ती खचून जाते. सगळ्यांना आनंदी ठेवणारी, सुख– दु:खात साथ देणार्या लतिकाने या गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि याचा तिला फारसा फरकही पडत नाही.याउलट दिसायला देखणा, अंगापिडानं मजबूत, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा अभिमन्यू आहे. स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला ‘फिट’ करायचं आहे, म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे. या प्रवासात योगायोगाने लतिका-अभिमन्यूची लग्नगाठ बांधली जाते.