Join us

सुनील ग्रोव्हर बनणार ​द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचा सूत्रसंचालक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 11:03 AM

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात प्रेक्षकांना अक्षय कुमार पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात झाकिर खान, मल्लिका दुआ, ...

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात प्रेक्षकांना अक्षय कुमार पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात झाकिर खान, मल्लिका दुआ, हुसैन दलाल मेन्टॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षय या कार्यक्रमात सुपर बॉस या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. हा कार्यक्रम अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन प्रचंड गाजले आहेत. या कार्यक्रमाने राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा, सुनील पाल, एहसान कुरेशी यांसारखे खूप चांगले कॉमेडियन छोट्या पडद्याला आणि मोठ्या पडद्याला मिळून दिले आहेत. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत एली अवराम दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता एलीच्या ऐवजी एका दुसऱ्या कलाकाराचा विचार केला जात आहे. एलीची या कार्यक्रमासाठी लूक टेस्ट देखील झाली असल्याची चर्चा आहे. मेन्टरसोबत तिने काही दिवस तालीमदेखील केली असल्याची चर्चा आहे. पण या कार्यक्रमासाठी ती योग्य नसल्याचे कार्यक्रमाच्या टीमला जाणवले असल्याने तिचा पत्ता कट करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचे हिंदी खूप चांगले असले पाहिजे असे टीमचे म्हणणे आहे. पण एलीचे हिंदी तितके चांगले नसल्याने सध्या छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध कॉमेडियनचा विचार केला जात आहे. सुनील ग्रोव्हर हे सध्या छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध नाव असल्याने त्याने या कार्यक्रमाचा भाग व्हावे अशी या कार्यक्रमाच्या टीमची इच्छा आहे. याबाबत त्याच्याशी सध्या चर्चा देखील सुरू असल्याचे म्हटले जात आहे. पण सुनीलकडे वेळ नसल्याने त्याच्या तारखांवर काम केले जात असल्याची चर्चा आहे. Also Read : OMG! ​सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाख